आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, 40 Forms For Ahmednagar And 32 For Shidi Loksabha, Divya Marathi News

पहिल्या दिवशी ‘नगर’साठी 40, तर शिर्डीसाठी नेले 32 अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी पहिल्याच दिवशी 19 उमेदवारांनी 40 अर्ज, तर शिर्डी मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 32 अर्ज नेले. यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, पहिल्या दिवशी एक अर्ज भरण्यात आला नाही.
शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे बबनराव घोलप, अँड. सादिक कादीर, काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे, आम आदमीचे सयाजी खरात, नितीन उदमले, पीपल्स रिपब्लिकन कवाडे गटाचे यशवंत म्हस्के, भारिप बहुजन महासंघाचे रघुनाथ मकासरे, बहुजन समता पक्षाचे सुरेश आदाणे यांच्यासह सात अपक्ष उमेदवारांनी अर्ज नेले. नगर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे, आम आदमीचे अनिल घनवट व संजय चोपडा यांच्यासह 19 उमेदवारांनी अर्ज नेले.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 26 ला दुपारी तीनपर्यंत आहे. 27 ला अर्जांची छाननी करण्यात येईल. अर्ज मागे घेण्यासाठी 29 मार्च ही शेवटची मुदत असून 17 एप्रिलला मतदान होईल. अर्ज नेण्यासाठी पक्षांच्या उमेदवारांनी प्रतिनिधी पाठवले असले, तरी दाखल करतेवेळी मोठे शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.