आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Election Issue At Nagar, Divya Mart Hi

शिवसेनेच्या एबी फॉर्मवरून गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोखंडे यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी याच मतदारसंघातून शिवसेनेकडून योगेश घोलप यांनीही एबी फॉर्मबरोबरच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने संभ्रम निर्माण झाला होता.

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असलेले सदाशिव लोखंडे दुपारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यावेळी त्यांच्याबरोबर आमदार अशोक काळे, अनिल राठोड, संभाजी दहातोंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे हेही होते. मात्र, याच मतदारसंघातून बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनी सकाळी एबी फॉर्मबरोबरच उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. त्यातच लोखंडे यांचे काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ताटकळत उभे राहावे लागले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार अनिल राठोड, अशोक काळे, शिवसेना संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर आदींनी कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन केले. लोखंडे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यासाठीचे कागदपत्र नसल्याने त्यांच्यासह आमदार राठोड, काळे यांच्यावर सेतू कार्यालयात वाट पाहण्याची वेळ आली. छाया : कल्पक हतवळणे