आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Government Ignoring Hunger Strike, Divya Marathi

उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर व्हावे, या मागणीसाठी आम आदमी पक्षाने (आप) सात दिवसांपासून, तर कर्जतला नगरपालिका व्हावी, या मागणीसाठी कर्जत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी तीन दिवसांपासून सुरू केलेल्या उपोषणावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, रविवारी पोलिसांनी ‘आप’च्या 19 उपोषणकर्त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
शेवगाव ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करावे, या मागणीसाठी नितीन दहिवाळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’ने सोमवारपासून (17 फेब्रुवारी) उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा रविवारी सातवा दिवस होता. 19 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. कर्जत ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी शुक्रवारपासून (21 फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.आजिनाथ कचरे, पोपट गोंजारे, बबन गलांडे, गोकुळ पवार, अशोक मोहळकर, कुंडलिक पवार, सचिन पवार, बुवासाहेब कदम, हिरा पवार, सुशीला ओव्हाळ, लीला कांबळे, गया भैलुमे, मंगल लोंढे, सुनंदा काकडे, कमल भिसे, लैला थोरात आदींचा उपोषणात सहभाग आहे.
उपोषणावर तोडगा न निघाल्याने उपोषण ‘आप’चे सातव्या, तर कर्जत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे तिसर्‍या दिवशीही उपोषण सुरूच होते. आमच्या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
‘आप’चे 19 कार्यकर्ते रुग्णालयात दाखल
तोडगा नाहीच। ‘आप’चे सात, तर कर्जतकरांचे तीन दिवसांपासून उपोषण
या उपोषणकर्त्यांना दाखल केले रुग्णालयात
संतोष मोहिते, राजू गायकवाड, वसंत मुराधे, सुभाष जाधव, गणेश हुशार, दादासाहेब कनगरे, रावसाहेब मिसाळ, संजय साठे, सुभद्रा सरोदे, हिरा मोहिते, अनिता खुडे, छबू मगर, रतन चव्हाण, सिंधू मगर, कस्तुरा मगर, शीला मोहिते, शशिकला दळवी, जनाबाई काते, गया साळवे, उज्‍जवला मांतग, शोभा मगर, रंजना भास्कर, उषा मोहिते, संगीता इंगळे व संगीता गाडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कर्जतकरांवर अन्याय
4 कर्जतची लोकसंख्या 27 हजार आहे. कर्जत ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करावे, यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवला आहे. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी प्रस्तावाबाबत वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. शेजारील जामखेडला नगरपालिकेची घोषणा झाली. मात्र कर्जतला नगरपालिकेचा दर्जा मिळू शकला नाही. राज्य सरकारने कर्जतकरांवर अन्याय केला आहे.’’ आजिनाथ कचरे, उपोषणकर्ता
उपोषणावर ठाम
4उपोषणाच्या सातव्या दिवशीही प्रशासनाच्या एकाही अधिकार्‍याने आमची भेट घेतली नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे शेवगावचे नगरपालिकेत रूपांतर होत नाही. पालकमंत्री मधुकर पिचड यांनी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आश्वासन न पाळल्यास सत्ताधार्‍यांविरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. आमच्या मागणीबाबत जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. ’’ नितीन दहिवाळकर, पदाधिकारी, आप.
‘आप’च्या उपोषणकर्त्यांना पोलिस वाहनातून रविवारी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. छाया : कल्पक हतवळणे