आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांनाच घाई अर्धवट कामांच्या उद्घाटनाची, आमदार राठोड यांचे टीकास्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरोत्थान अभियानांतर्गत यश पॅलेस ते चाणक्य हॉटेलपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील कोठी रस्त्याच्या कामाचे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी २३ ऑगस्टला लोकार्पण केले. त्याचा निषेध नोंदवत आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शविसेनेने सोमवारी या रस्त्याचे उद्घाटन केले. युतीच्या सत्ताकाळात या रस्त्याला मंजुरी मिळून काम सुरू झाल्याचा दावा करत राठोड यांनी अर्धवट कामाच्या उद्घाटनाची महापौरांनाच घाई झाल्याचा टोला लगावला.
राठोड म्हणाले, कोठी रस्त्याचे श्रेय शविसेना-भाजप युतीकडे जाते. युतीचे महापौर असताना त्यांनी उत्कृष्ट कामे केली. आघाडीच्या कालावधीत झालेल्या एका रस्त्यावर २५ वेळा दुरुस्ती करावी लागते. मात्र, आता कोठी रस्त्याकडे पुढील २० वर्षे पाहण्याची गरज पडणार नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन महापौर करतातच कसे, असा सवाल उपस्थित करत हा रस्ता होण्यासाठी त्यांनी काहीही केले नसल्याचा आरोप राठोड यांनी केला. नगरोत्थानचा निधी सरकार सर्वच महापालिकांना देते. त्यात महापौरांनी कोणता वेगळा तीर मारलेला नाही. हा निधी वापरायचा कसा हेच महापौरांना कळले नाही. सध्याचे सत्ताधारी हे जादूगार आहेत. त्यांनी केलेल्या रस्त्याचे काम रात्री ११ वाजता सुरू होऊन रात्री १२ ला संपते. नकला आणि चमकोगिरी करण्यात सत्ताधारी दंग आहेत. शहरात राष्ट्रवादीचा आमदार होणे शक्य नाही. आम्ही काय लुटारुंची टोळी नाही. याच सत्ताधाऱ्यांनी नविदिची पेटी पळवून नेली होती. त्यांच्या भंपक आश्वासनांना जनता बळी पडणार नाही, असे राठोड म्हणाले.
मला २५ वर्षे काय केले, हे विचारण्याऐवजी महापौरांनी मुख्यमंत्र्यांनी ६५ वर्षांत काय केले याचा जाब विचारावा. भ्रष्टाचार, लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी यात राज्य सर्वांत पुढे आहे. सत्ताधाऱ्यांकडे दाखवण्यासारखे काहीच नसल्याने उद्घाटनाचा देखावा त्यांच्याकडून केला जात आहे. "फेज टू'च्या कामाला इतकी वर्षे का लागली, असा प्रश्न उपिस्थत करत अयोग्य व्यक्तीला ठेका दिल्याने कारभार बिघडला असा आरोप राठोड यांनी केला. काविळीच्या वाढत्या साथीसंदर्भात महापौर गप्प आहेत. नवीन नगरसेवकांकडे एक रुपया खर्च करण्याचा अधिकार नाही, असेही राठोड म्हणाले.तुमच्याच पक्षातील लोक तुम्हाला गुंड म्हणत आहेत. त्यामुळे आम्हाला वेगळे सांगण्याची गरज आता भासणार नाही, अशी कोपरखळीही राठोड यांनी महापौर जगताप यांना मारली.
नविडणूक जवळ आल्याने आपण काहीतरी करतोय, हे दाखवण्यासाठी महापौरांचा सर्व खटाटोप सुरू आहे. त्यामुळेच अर्धवट काम झालेल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. कोठी रस्ता हे आमचे यश आहे. त्यांच्या काळात असे रस्ते झाले नाहीत. रिलायन्सचे पाच कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल करत भ्रष्टाचार, मुजोर ठेकेदारांना ठेका दिला जात असल्याचा आरोप आमदार राठोड यांनी यावेळी बोलताना केला. घाेटाळेबाजांचा कारभार सध्या सुरू आहे. त्यांची गुंडगिरी व दादागिरी शविसेना सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.
माजी महापौर शीला शिंदे, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शविसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गटनेते संजय शेंंडगे, सचिन जाधव, विक्रम राठोड, प्रकाश भागानगरे आदींसह अन्य कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.
बालिकाश्रम रस्त्यासाठी आज करणार आंदोलन
बालिकाश्रम रस्त्याच्या मध्यभागी मोठे दगड टाकल्याने एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाल्याचा आरोप करत आमदार अनिल राठोड यांनी सोमवारी या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याचे काम रखडल्याचे सांगत त्यांनी तातडीने काम मार्गी लावण्यासाठी शेवटचा दणका देण्याचा इशारा त्यांनी दिला. मंगळवारी (२६ ऑगस्ट) या कामासाठी निर्णायक आंदोलन करणार असल्याचे आमदार राठोड यांनी यावेळी जाहीर केले.
महापौर जगताप यांनीआत्मपरीक्षण करावे
आम्ही सुरू केलेल्या भुयारी गटार योजनेचा पाठपुरावा करणेही सत्ताधाऱ्यांना जमलेले नाही. याबाबत महापौरांनी आत्मपरीक्षण करावे. विद्यमान महापौर संग्राम जगताप यांच्या यापूर्वीच्या महापौरपदाच्या कालावधीत पंधरा महिने नगरोत्थान योजनेसाठी आलेला निधी पडून होता. पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही ई-टेंडर पद्धत सुरू केली. घरकुल योजनेसाठीही ३१ कोटी शविसेनेनेच आणले, असे माजी महापौर शीला शिंदे म्हणाल्या.