आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Political News In Marathi, Political Issue At Nagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण : जागावाटपाचा तिढा कायम, असंतुष्टांपुढे आव्हान स्वतंत्र आघाडीचे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे असे दोन्ही काँग्रेसचे ठरले आहे. या निवडीच्या पूर्वसंध्येला दोन्ही काँग्रेसने स्वतंत्र बैठका घेऊन व्युहरचना ठरवण्यात आली. अध्यक्षपदासाठी मंजुषा गुंड यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, राष्ट्रवादी व काँग्रेसमधील असंतुष्ट सदस्य बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याने स्वतंत्र आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तथापि दोन्ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या केवळ वावड्या असल्याचे स्पष्ट करून या चर्चेचे खंडन केले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरात दोन वििवध ठिकाणी बैठका सुरूच होत्या.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून रविवारी (२१ सप्टेंबर) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडी होणार आहे. पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद आेबीसी महिलेसाठी राखीव आहे. या पार्श्वभूमीवर तुषार गार्डन, तसेच संकेत हॉटेलमध्ये काँग्रेसच्या सदस्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. राष्ट्रवादीची बैठक रात्री उशिरापर्यंत तारकपूर येथील सिंग रेसिडेन्सी हॉटेलमध्ये सुरू होती. परिसरातील कार्यकर्त्यांचा कानोसा, घेतला असता स्वतंत्र आघाडीच्या तयारीत काही सदस्य असल्याचे समजले. यासाठी कर्डिले, मुरकुटे, पाचपुते गट प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादीकडून मंजुषा गुंड याचे नाव चर्चेत आहेत. त्यामुळे काही सदस्य अस्वस्थ आहेत. त्याबरोबरच कालिंदी लामखडे, अश्विनी भालदंड, योगिता राजळे यांच्याकडूनही मोर्चे बांधणी करण्यात आली आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी होईल, हे निश्चित असले तरी स्वतंत्र आघाडी होऊन राष्ट्रवादी बाजूला पडण्याची शक्यताही नाकारली जात नाही. पण बहुमतासाठी संख्याबळ जुळवणे कठीण आहे. काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी अॅड. सुभाष पाटील, बाळासाहेब हराळ, अण्णासाहेब शेलार, परमवीर पांडुळे आदी नावे चर्चेत आहेत.

सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी तीन वाजता विशेष सभेत निवडी होतील.
संयुक्त बैठकीत नावे निश्चित होणार
शनिवारी होणाऱ्या पक्षांतर्गत सदस्यांच्या बैठकीत इच्छुकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री मधुकर पिचड, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत दोन्ही काँग्रेसची संयुक्त बैठक होणार आहे. याच बैठकीत पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित होणार आहेत. निवड प्रक्रियेत कोणत्याही सदस्यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊ नये, यासाठी कावाई करण्याची तयारीही करण्यात आली आहे, असे राष्ट्रवादीच्या गोटातून समजले.
दोन्ही काँग्रेसच्या शनिवारी रात्री बैठका सुरू असताना स्वतंत्र आघाडी होण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. स्वतंत्र आघाडीसाठी भाजप व शिवसेने १२ सदस्य, राष्ट्रवादीचे एक तृतीअंश ११ सदस्य, काँग्रेसचे १३ व इतर २ असे संख्याबळ जुळवले, तर ३८ हा बहुमताचा आकडा होऊ शकेल. तथापि हे संख्याबळ जुळवणे कठीण असून सारे काही जर व तर या शब्दांवरच अवलंबून आहे.