आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Saharad Pawar Rally Canceled Issue At Nagar, Divya Marathi

शरद पवार यांची सभा ऐनवेळी रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारार्थ दिल्लीगेट येथे शुक्रवारी होणारी शरद पवार यांची सभा रद्द झाली. त्यामुळे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले. मात्र, कोणीही उघड बोलायला तयार नव्हते.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. स्टार प्रचारकांच्या सभा जिल्ह्यात झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याही सभा झाल्या. गावोगाव लागलेले प्रचारफलक व दवंडी पिटवत फिरणार्‍या गाड्यांमुळे राजळेंसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्या तुलनेत प्रचार उशिरा सुरू करणारे भाजपचे उमेदवार दिलीप गांधी मागे पडले आहेत. शनिवारी (12 एप्रिल) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सावेडीत सभा होणार आहे. या सभेसाठी लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे गृहित धरून नियोजन झाले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ‘मोठय़ा साहेबांची सभा’ म्हणून कार्यकर्ते तयारीत होते. पण शुक्रवारी दुपारी पवार यांची सभा अचानक रद्द झाल्याचे समजल्याने काही उत्साही कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले व एक मोठी संधी गमावल्याची भावना त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलून दाखवली.

रद्द नव्हे स्थगित
सभा रद्द झाली नाही, ती स्थगित झाली आहे. पवारसाहेबांचा दिवसभराचा प्रचार दौरा होता. साडेसातला सभा संपवून पुन्हा बारामतीला जायचे होते. म्हणून आम्ही म्हणालो, एवढी ओढाताण नको. 14 किंवा 15 एप्रिलला आम्हाला तारीख दिली तरी चालेल. ही सभा नंतर घेण्यात येईल.’’ घनश्याम शेलार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.