आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Sanjay Chopda Candidate, Divya Marathi

माजी नगरसेवक संजय चोपडा उतरणार निवडणूक रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी नगरसेवक संजय चोपडा महापालिका निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बुधवारी त्यांनी उमेदवारी अर्ज नेला. त्यांच्या उमेदवारीने भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या शहरातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीत चोपडा यांच्याविरूद्ध खासदार गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांच्यात लढत झाली होती. चोपडा यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज नेला. यासंदर्भात त्यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, मनपा निवडणुकीचा अर्ज नेण्याशी काहीही संबंध नाही. आता नगरसेवकापेक्षा वरिष्ठ पद आवश्यक वाटते. खासदार होण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यानुसार मलाही खासदार व्हावेसे वाटते. मी अर्ज भरणार असून माघारीचा प्रo्नच नाही. हा मुद्दा पुढे करून ‘साहेबां’ना (आमदार अनिल राठोड यांचे नाव न घेता) बदनाम करू नये, असे त्यांनी सांगितले. अर्ज नेल्यानंतर चोपडा हे आमदार राठोड यांच्यासमवेत शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याने त्याची चर्चा सुरू आहे.