आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Sanjay Raut Speak In Rally Issue At Nagar, Divya Marathi

वाकचौरेंच्या पराभवाने परिवर्तनाची सुरुवात करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- देशभरात परिवर्तनाची लाट आली आहे. राज्यातही शिवसेनेची लाट आहे. या लाटेत भ्रष्टाचारी काँग्रेस वाहून जाईल. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कणखर माणूस सत्तेवर आल्याशिवाय या देशातील भ्रष्टाचारी तुरुंगात जाणार नाहीत. परिवर्तनाची ही सुरुवात साईबाबांना फसवून गद्दारी करणार्‍या वाकचौरेंच्या पराभवाने करा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.

शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ बुधवारी (9 एप्रिल) सायंकाळी राऊत यांची सभा झाली. लोखंडे यांच्यास प्रचारार्थ ही पहिलीच सभा होती. उपजिल्हाप्रमुख अँड. दिलीप साळगट, शहरप्रमुख अमर कतारी, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, अमोल कवडे, अर्जुन काशिद, भरत फटांगरे, मुरारी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होत.

राऊत म्हणाले, जातीय भावना भडकावण्याचे काम करताना नेहमीच हिंदू समाजाला दाबण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. दोन समाजात हे काँग्रेसवाले नेहमीच मतांसाठी धार्मिक विभाजन करत आले आहेत. प्रचंड भ्रष्टाचार, घोटाळे करत काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या संपत्तीत वाढ केली. भ्रष्टाचाराचे मूळ असलेली काँग्रेस उखडून टाकण्याची वेळ आता आली आहे.

निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेसवाले भ्रष्टाचारी मार्गाने आलेला पैसा वापरतात. पैशाचा पाऊस पाडून गरिबांची मते विकत घेतात आणि निवडणुका जिंकतात. देशात मोदींचे सरकार आणि महाराष्ट्रात शिवशाही यायला हवी. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतून गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी चारशे कोटी आणले. मात्र, अद्याप चारशे रुपयांची मदत संबंधित शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली का? असा सवाल त्यांनी केला. या सरकारचा जनता, कष्टकरी आणि शेतकर्‍यांशी काही संबंध नसल्याचे सांगत राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. मात्र, संगमनेर अजून शांत कसे? गद्दारी करणारा वाकचौरे चपला, अंडी खातोय ही गमतीशीर गोष्ट येथे पहायला मिळाली. काँग्रेसवाल्यांना इटलीतून आलेल्या सोनिया गांधी निवडणुकीसाठी चालतात आणि जिल्ह्याच्याच दक्षिण भागातील आमचा उमेदवार परका असल्याची टीका काँग्रेसवाले करतात, अशा शब्दांत राऊत यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

चमको नेत्यामुळे सभेला उशीर
सभेचे नियोजन शिवसेनेच्या ‘चमकोगिरी’ करणार्‍या तालुकास्तरीय नेत्याकडे देण्यात आले होते. मात्र, सभेचा कोणताही प्रचार त्यांनी केला नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निरोप दिले नाहीत. सहाची सभा पावणेआठला सुरू झाली. दीड तास थांबूनही गर्दी जमत नसल्याने पदाधिकारी हवालदिल झाले. अखेर जवळच्या नागरिकांना बोलावून व कार्यकर्त्यांना फोन करून गर्दी झाल्यावर सभा झाली.