आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर, १५, १६ जूनला उमेदवारी अर्ज दाखल होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी महापौर उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला. २१ जूनला सकाळी ११ वाजता होणाऱ्या या निवडणुकीसाठी १५ १६ जूनला अर्ज विक्री अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणुकीच्या दिवशी अर्जांची छाननी अर्ज मागे घेण्यास वेळ दिला जाईल. त्यानंतर आवश्यकता असल्यास मतदान होईल, असे कवडे यांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, तरी आघाडीकडून कोणत्याच हालचाली नाहीत. काँग्रेसने या प्रदेश काँग्रेस कमिटीकडून मार्गदर्शन मागवले आहे.

महापौर अभिषेक कळमकर यांचा कार्यकाळ ३० जूनला संपत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक २१ जूनला होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कवडे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नव्हता. आता िनवडणुकीचे "काउंटडाऊन' सुरू झाले अाहे. मनपाची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपने जय्यत तयारी केली आहे. अपेक्षित संख्याबळाचा आकडा गाठण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. काँग्रेस आघाडीत मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.
शिवसेनेने अनेकांना आपल्या गळाला लावले आहे. त्यामुळे आघाडीची अडचण झाली आहे. निवडणूक लढवायची की नाही, असा प्रश्न सध्या आघाडीसमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते या निवडणुकीबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. काँग्रेसचे दोन राष्ट्रवादीचे एक असे तीन बंडखोर शिवसेनेने सहलीला पाठवले आहेत. शिवसेनेकडे जाणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे महापालिकेवर शिवसेना-भाजपचा भगवा फडकणार असे सध्या तरी चित्र आहे.

शहर जिल्हा काँग्रेसने या निवडणुकीबाबत प्रदेश काँग्रेस कमिटीकडून मार्गदर्शन मागवले आहे. त्यामुळे सध्या एकतर्फी समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत ऐनवेळी मोठे राजकीय धमाके होण्याची शक्यता आहे.

महासभेनंतर अर्ज विक्री
दरम्यान,महापौर अभिषेक कळमकर यांनी १४ जूनला महासभा बोलावली आहे. या सभेत लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेले काँग्रेसचे गटनेते संदीप कोतकर यांच्या नगरसेवकपदाचा निर्णय होणार आहे. त्यांचे पद रद्द करण्याबाबत मनपा प्रशासनाने कायदेशीर मार्गदर्शन मागवले आहे. हा अहवाल सभेसमोर ठेवण्यात येईल. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आघाडी भाजपकडे सर्वांच्या नजरा
शिवसेनेनेशहरप्रमुख संभाजी कदम यांची पत्नी सुरेखा यांची उमेदवारी निश्चित केली आहे. भाजपमध्ये मात्र उपमहापौरपदाच्या उमेदवारीचा गोंधळ सुरू आहे. अर्ज दाखल करण्यासाठी १६ जून ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे भाजपकडून उपमहापौरपदासाठी कोण अर्ज दाखल करणार याची उत्सुकता आहे. आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतले जातील की नाही, याकडेदेखील अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...