आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणाकडे करिअर म्हणून बघा, आमदार पंकजा मुंडे-पालवे यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्पर्धेमुळे नकारात्मकता वाढत आहे. मात्र, उदास न होता युवकांनी संघर्ष करण्याची उमेद बाळगावी. समाजात काही चांगले बदल घडत आहेत. युवकांनी राजकारणाकडेही करिअर म्हणून बघावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी रविवारी केले.

हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या आवारातील नूतन विद्यार्थिनी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या मुंडे बोलत होत्या. खासदार दिलीप गांधी, महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, र्शीरामपूरच्या नगराध्यक्ष रार्जशी ससाने, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे, प्राचार्य डॉ. सहदेव मेढे, शिरीष मोडक, हेरंब औटी, रोहिणी शिवलकर, वसंत लोढा आदी या वेळी उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, तरुण पिढी ध्येयापासून ढळत आहे. तिला ध्येय देण्याचे काम करावे लागणार आहे. भारत तरुणाईचा देश आहे. या तरुणांना वेळीच दिशा दिली गेली नाही, तर दिशा भरकटलेला देश म्हणून आपल्याकडे पाहिले जाईल. शिक्षण केवळ कमावण्यासाठी घेऊ नका, तर समाज घडवण्यासाठी शिक्षण घ्या, असे आवाहन मुंडे यांनी या वेळी बोलताना केले.

गांधींची अडचण
वसंत लोढा म्हणाले, हिंद सेवा मंडळाने सर्वांना बरोबर घेतले. माझे बघा, संघ व भाजपत मी 28 वर्षे काम करत होतो. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचा माझ्यावर मोठा पगडा. मात्र, काही कारणांमुळे सहा महिन्यांपूर्वी मला मनसेत जावे लागले. या वक्तव्याने खासदार गांधी यांची मोठी अडचण झाली. मात्र, त्यांनी स्मित करत प्रतिक्रिया देणे टाळले.

आठवणी जपा
मुंडे म्हणाल्या, वडिलांनी मला परळीच्या जिल्हा परिषद शाळेत घातले. या शाळेत टाकल्याबद्दल वडिलांचे आभार मानले पाहिजेत. मी कुठल्याच वसतिगृहात एक महिन्यापेक्षा जास्त राहिले नाही. मात्र, वसतिगृहातील आठवणी मी हृदयात जपून ठेवल्या आहेत. वसतिगृहातील आठवणी तुम्हीही विसरू नका, असे त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले.