आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब महिलांपर्यंत गर्भसंस्कार पोहोचवावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"आयुर्वैदीय गर्भसंस्कार' या पुस्तकाचे प्रकाशन करताना कांतिलाल उमाप, अरुण जाखडे, अॅड. शंकर निकम, डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. शारदा महांडुळे, डॉ. प्रशांत महांडुळे आदी. - Divya Marathi
"आयुर्वैदीय गर्भसंस्कार' या पुस्तकाचे प्रकाशन करताना कांतिलाल उमाप, अरुण जाखडे, अॅड. शंकर निकम, डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. शारदा महांडुळे, डॉ. प्रशांत महांडुळे आदी.
नगर- भारताचीभावी पिढी सुसंस्कृत सुदृढ करण्यासाठी गर्भसंस्कार मार्गदर्शन हे सामान्य गरीब महिलांपर्यंत पोहाेचले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अिधकारी कांतिलाल उमाप यांनी केले.

केडगाव येथील डॉ. शारदा महांडुळे लिखित "आयुर्वैदीय गर्भसंस्कार' या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करताना उमाप बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक प्राचीन मंत्र शास्त्राचे अभ्यासक अॅड. शंकर निकम, फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलियन अँड गायनॉकॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंिडयाचे अध्यक्ष डॉ. अरविंद संगमनेरकर, अरुण जाखडे, अहमदनगर मित्रमंडळ पुण्याचे अध्यक्ष उत्तमराव करपे, मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव विजयकुमार ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ. महांडुळे यांच्या पुणे येथील टिळक रोडवरील बाह्यरुग्ण विभागाचेही उद््घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात उमाप पुढे म्हणाले, "आयुर्वैदीय गर्भसंस्कार' हे गर्भसंस्कारविषयक पुस्तक सर्वांना मार्गदर्शक ठरेल. पुणे जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात गरजू महिलांपर्यंत गर्भसंस्कार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

डॉ. संगमनेरकर म्हणाले, या पुस्तकातील विषय महत्त्वपूर्ण आहे. हे पुस्तक आजच्या आधुनिक काळात आयुर्वैदीक उपचार कसे करावेत, याबद्दल मार्गदर्शन करते.
डॉ. निकम म्हणाले, भारताची भावी पिढी सुसंस्कृत करण्यासाठी प्रत्येक मातेने गर्भावस्थेतच बाळावर संस्कार करावे.

डॉ. महांडुळे यांनी पुस्तक लिहिण्यामागील भूमिका स्पष्ट केली. प्रास्ताविक डॉ. प्रशांत महांडुळे यांनी केले. सूत्रसंचालन अंजली तागडे यांनी केेले.

या पुस्तकाच्या पहिल्या दोन आवृत्त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. महांडुळे या दूरचित्रवाणी अन्य माध्यमातून आरोग्यविषयक मार्गदर्शन करत असतात. त्याचा लाभ रूग्णांना होत आहे.
बातम्या आणखी आहेत...