आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय जलसंधारण सुकाणू समितीवर पोपटराव पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयांतर्गत येणा-या राष्ट्रीय जलसंधारण सुकाणू समितीवर राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची निवड झाली.
मंत्री नितीन गडकरी या समितीचे अध्यक्ष असून त्यांनी पवार यांचे कार्य व अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांची निवड केली. मृद व जलसंधारणातून पडीक जमिनी उत्पादनक्षम बनवणे व गावे जलसमृद्ध करण्याचे काम या योजनेतून होते. पवार यांच्या निवडीने हिवरेबाजार व आदर्शगाव योजनेच्या प्रदीर्घ अनुभवाचा देशाला फायदा होणार आहे. सरपंच म्हणून हिवरेबाजारमध्ये त्यांनी उभारलेल्या लोकाभिमुख कामांचा शासन, ग्रामसभा, ग्रामपंचायत व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी फायदा होईल. यातून ग्राम परिवर्तनाला नवीन दिशा मिळेल, असा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.