आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Popatrao Pawar News In Marathi, Water Crises, Nagar, Divya Marathi

भविष्यात पाण्याच्या हंड्याला हात लावण्यासाठी भांडणे होतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भूजल दूषित झाल्याने पाण्याबरोबरच पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेती दूषित झाल्याने माणसाचे आरोग्य बिघडले आहे. भविष्यात सोन्याने भरलेल्या हंड्याला कोणी हात लावणार नाही, पण पाण्याने भरलेल्या हंड्याला हात लावण्यासाठी आपसात भांडणे होतील, असा इशारा आदर्शगाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिला.


शहरातील आनंदधाम येथे आयोजित महावीर व्याख्यानमालेत आयोजित ‘पर्यावरण, पाणी व मानव’ या विषयावर पवार बोलत होते. यावेळी किशोर गांधी, अल्पना गांधी, कल्पना गांधी, नरेंद्र फिरोदिया उपस्थित होते.
पवार म्हणाले, शंभर वर्षांत आम्ही पर्यावरणाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे भूजल दूषित झाले आहे. त्यामुळे शुद्ध पाणी आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड्यातील माणुसही आता शुद्ध पाण्यासाठी बिसलेरीकडे वळाला आहे. पण खासगी कंपन्यांमध्ये तयार होणार्‍या शुद्ध पाण्याच्या बाटल्या सुरक्षित नाहीत आणि नळाचे पाणीही विश्वासाचे राहिले नाही. बाटल्यांमधील साठ टक्के पाणी दूषित आहे. उत्तराखंडचा महापूर, राज्यात झालेली गारपीट पाहिल्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगऐवजी ग्लोबल कुलिंगची चर्चा होत आहे, असे का घडते? याचा विचार व्हायला हवा. भारतीय संस्कृती पाणी, पर्यावरण आणि मातीशी निगडीत आहे. काही उत्सव निसर्गाशी संबंधित आहेत. पण आपण संस्कृतीपासून दुरावत असल्याने पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरची सीना नदी, भिंगारचा नाला स्वच्छ केले, तर प्रश्न सुटतील, असे पवार म्हणाले.


पर्यावरणासाठी माणसाला बदलावे लागेल
पर्यावरण टिकवायचे असेल, तर प्रथम माणसाला बदलावे लागेल. त्यासाठी शिक्षणातून जीवनाचा संदेश मिळायला हवा. भविष्यात तुपासारखे पाणी वापरावे लागेल, असे त्यावेळी भगवान महावीरांनी सांगितले. भविष्यात कोणतेच नियोजन नसल्याने 2020 मध्ये पिण्यासाठी पाणी उरणार नाही, असे पवार यांनी सांगितले.