आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही आमचे गाव स्वच्छ करून दाखवले, तुम्हीही करा- पोपटराव पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रत्येक घरापासून स्वच्छतेची सुरुवात झाली पाहिजे. मग प्रभाग व त्यानंतर शहर स्वच्छ होईल. हिवरेबाजार स्वच्छ करण्यासाठी आम्हीही तेच केले. राज्यकर्ते व अधिकाऱ्यांपेक्षा शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची अधिक आहे. आपण कर देतो म्हणजे आम्ही केलेला सर्व कचरा महापालिकेनेच उचलला पाहिजे, हा दुराग्रह नागरिकांनी बदलला पाहिजे. कर देणे हा नैतिक अधिकार आहे, तर कचरा न करणे हे नैतिक कर्तव्य असल्याचे सरपंच पोपटराव पवार यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’ बोलताना सांगितले.

‘स्वच्छ नगर’कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त होण्यासाठी उपाय सुचवताना पवार म्हणाले, शहरातील उपनगरांमध्ये भूमिगत गटाराचे काम सर्वप्रथम हाती घेणे गरजेचे आहे. वर्षभरात या कामाबाबत नियोजन केले नाही, तर हा भागही सीना नदीसारखा दिसणार आहे. उपनगरातील नागरिक त्याठिकाणी राहू शकणार नाहीत. शहरात आरोग्यावर होणारा खर्च सर्वाधिक आहे. याला सर्वांत मोठे कारण अस्वच्छता व डासांची निर्मिती हा आहे. हिवरेबाजारसारख्या गावात आम्ही घरापासून सुरुवात करून शेवटी गाव स्वच्छ ठेवण्यात केली आहे. आम्ही करून दाखवलेला प्रयोग नगरकरांना अंमलात आणणे फारसे अवघड नाही. फक्त सुरुवात स्वत:पासून करायला हवी. आपली जबाबदारी ओळखून सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे.