आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता विज्ञानाला हवी अध्यात्माची जोड : पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देशात विज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. भारत महासत्ता होण्यासाठी विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
सद्गुरु सुभाषबप्पा भक्त मंडळातर्फे नंदनवन लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीक्षेत्र मलकापूर येथील एकनाथ महाराज दर्शन सोहळ्यात ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती शरद झोडगे, शिवाजी कदम, संजय जाधव, बाळासाहेब हिंगे, जालिंदर खंदारे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, महाराष्ट्राला अध्यात्माची मोठी परंपरा लाभलेली आहे. संताच्या विचाराच्या राज्यात अलीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. तो कायम राखण्यासाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारत प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन पवार यांनी केले.