आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामविकासाचा गाभा समजला की योजना राबवता येतात; पोपटराव पवार यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- मर्यादित आणि अनिश्चित उत्पन्नामुळे गावाचा विकास खुंटतो. त्यामुळे शासकीय निकष पूर्ण करणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत किंवा नगरपालिका हा एक चांगला पर्याय आहे, असे प्रतिपादन आदर्श हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. 


पवार यांनी बेलापूर बुद्रूक ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी अनौपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, गावगाडा हाकताना गावासाठी काय भलं आहे याचे चिंतन, मनन आणि सखोल अभ्यास करणे गरजेचा आहे. ग्रामविकासाचा गाभा ध्यानात आला की, शासकीय योजना राबवता येतात. निधीअभावी खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी अलीकडे नगर जिल्ह्यातील निकष पूर्ण ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतींमध्ये झाले आहे. त्यामुळे सरकारचा मोठा निधी मिळतो, विविध योजना गावात येतात. सक्षम प्रशासक, अन्य अधिकारी आणि आकृतिबंधानुसार सेवकवर्ग मिळतो. निधीवाचून प्रलंबित राहिलेल्या समस्या सुटण्यासाठी मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले. 


निवडणुकीच्या राजकारणातून द्वेषभावना वाढल्याने गावाचा विकास केवळ कागदांवरच राहिल्याने समस्या आहे तशाच राहून असुरक्षितता निर्माण झाली. मोबाइल, इंटरनेट पुढील पिढ्यांना देताना त्याच्या वापरासाठी योग्य संस्कारही देण्याची गरज आहे; अन्यथा नैराश्यातून व्यसने जडण्याचा मोठा धोका असतो. महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे खेड्याकडे चला ग्रामसुराज्य योजना राबवून गावे समृद्ध झाली पाहिजेत, अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली. सरपंच भरत साळुंके, उपसरपंच शिरीन शेख यांनी ग्रामस्थांच्या वतीने, रवींद्र खटोड यांनी खटोड पतसंस्थेच्या वतीने, प्रशांत लड्डा यांनी व्यापारी संघातर्फे, तर मारुतराव राशीनकर, प्रा. ज्ञानेश गवले, नवनाथ कुताळ, दिलीप दायमा, अरविंद शहाणे यांनी पत्रकार संघाच्या वतीने पवार यांचा सत्कार केला. यावेळी पं. स. सदस्य अरुण नाईक, ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे, सदस्य सीताराम गायकवाड, विजय शेलार, जालिंदर कुऱ्हे, भास्कर बंगाळ, दिवाकर कोळसे, प्रमोद कर्डिले, विवेक वाबळे, अनिल पवार, विलास मेहेत्रे, किशोर राऊत, किशोर बोरुडे, भूषण चगेंडे, प्रकाश जाजू, प्रकाश कुऱ्हे, अतिष देसरडा, शरद पुजारी, बाळासाहेब नगरकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...