आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमाल पंचायत व कल्याणकारी संघात वाढीव वाराई दराचा करार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- हमाल पंचायत व जिल्हा मोटार मालक कल्याणकारी संघ यांच्यात वाढीव वाराई दराबाबत तीन वर्षांचा करार करण्यात आला. सहायक कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले व संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी करारपत्रांच्या कागदपत्रांचे आदान-प्रदान केले. नवीन करारानुसार किराणा भुसार मालाची वाराई रक्कम लेव्हीसह 60 रुपये प्रतिटन असेल. कांदा लेव्हीसह 60 रुपये प्रतिटन, चिंच साडेतीन रुपये प्रतिटन अशी वाराईची वाढीव रक्कम राहणार आहे.
मिरची, सूर्यफूल, शेंगा, धने, एरंडी या स्वरूपाच्या हलक्या वजनाच्या मालाची वाराई (भोत असल्यास) साडेतीन रुपये प्रतिनग व पोते असल्यास अडीच रुपये प्रतिनग असेल. वाराई दर हे कोणत्याही वाहनांची वाहतूक क्षमता विचारात न घेता निश्चित करण्यात आली आहे. वाराईचे काम केवळ मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगारांनीच करावयाचे आहे. बाहेरील व्यक्तींकडून हे काम होत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. 31 मार्च 2017 पर्यंत हे दर लागू राहणार आहेत. यावेळी गोविंद सांगळे, मधुकर केकाण, नवनाथ महानूर, मोहन साप्ते, बबन आजबे, रज्जाक शेख, राजेंद्र आवारे, शिवलिंग डोंगरे, संजय गोंगे, काका शेळके, संतोष भंडारी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.