आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: आजपासून बडी साजन मंगल कार्यालयात रंगणार रंग-रेषांचा महोत्सव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन आणि ‘कलाजगत’तर्फे आयोजित देशातील एकमेव अशा अखिल भारतीय पोर्ट्रेट (व्यक्तिचित्रण) स्पर्धेस शनिवारपासून बडी साजन मंगल कार्यालयात सुरुवात होत आहे. रंग-रेषांचा हा महोत्सव दोन दिवस रंगेल.
 
स्पर्धकांशिवाय देशभरातील दिग्गज कलावंतांचा सहभाग हे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य आहे. 
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अशी स्पर्धा नगरसारख्या लहान शहरात भरवली जात असल्याबद्दल दिग्गज कलावंतांनी कौतूक केल्याची माहिती प्रसिद्ध शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे यांनी दिली. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, दिल्ली, छत्तीसगड, तेलंगाणा, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतील कलांवत आपली कला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
या वर्षीच्या स्पर्धेत विशेष बदल करण्यात आला असून, स्पर्धेच्या आवारात चित्र प्रदर्शन, निमंत्रित पाहुण्यांचे प्रात्यक्षिक, विख्यात सन्माननीय चित्रकारांचा कलाविष्कार मुख्य स्पर्धा, तसेच अहमदनगर शहरावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी विशेष ‘सेल्फी पाँईट’ अशी अतिशय आकर्षक रचना असेल. स्पर्धास्थळी कलामहर्षी गुरुवर्य र. बा. केळकर कला जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणारे वास्तववादी चित्रकार लेखक रवी परांजपे यांच्या गाजलेल्या १५ चित्रांचे, तसेच गतवर्षीच्या विजेत्यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या दालनाने चित्र रसिकांचे स्वागत होईल. मुख्य सभागृहात जगविख्यात चित्रकार या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे वासुदेव कामत यांचे प्रात्यक्षिक होईल. दोन दिवसांच्या या सोहळ्याला देशभरातून ज्येष्ठ चित्रकार उपस्थित राहणार आहेत. हे चित्रकार मुख्य सभागृहात व्यक्तिचित्रण करणार आहेत. त्या नंतरच्या भव्य दालनात विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमवटवून नगर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नामवंत व्यक्ती मॉडेल म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
 
शनिवारी (९ सप्टेंबर) सायंकाळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा युवा चित्रकार देवदत्त पाडेकर याच्या चित्रांविषयीच्या माहितीचा स्लाईड शो होणार आहे. अखिल भारतीय स्तरावरील विद्यार्थी व्यावसायिक गटात ही स्पर्धा घेण्यात येते. या स्पधेतील विजेत्या स्पर्धकांची निवड त्यांच्या कला क्षेत्रातील आजवरच्या कामगिरीवर अतिशय कठोर निकषांवर करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांची घोषणा रविवारी संध्याकाळी करण्यात येईल. रात्री वाजता तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर , ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, चित्रकार रवी परांजपे दाम्पत्य, दत्तात्रय पाडेकर मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. देशभरातील एकमेव कला प्रांतातील प्रतिष्ठेच्या या सोहळ्याला महाराष्ट्र देशाच्या काही भागातून मान्यवर चित्रकार, कला समीक्षक, अभ्यासकांसह राज्य देशभरातील कलारसिक, पत्रकार प्रतिष्ठित नागरिकांची विशेष उपस्थित लाभणार आहे. गेल्या वर्षीचे विजेतेही येथे उपस्थित राहून यातील काहीजण हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी नगरमध्ये मुक्कामी राहणार आहेत. रंगोत्सवाचा हा सोहळा अनुपम अद्वितीय असेल. हा सर्व सोहळा चित्र रसिकांना, अभ्यासकांसाठी दोनही दिवस खुला असणार आहे. 
 
पुढील वर्षीपासून व्यक्तिशिल्प स्पर्धा 
पुढीलवर्षी व्यक्तिशिल्प स्पर्धा सुरू करणार असल्याची माहिती चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी दिली. अशा प्रकारची ही स्पर्धाही देशात एकमेव असेल, असे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...