आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट कर्मचारी दर बुधवारी येणार सार्वजनिक वाहनाने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-महागाई, आर्थिक मंदी, वित्तीय लूट, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरती पत अश्या नैराश्याच्या वातावरणात एक दिवस खासगी वाहनाचा वापर टाळून कर्मचा-यांनी दर बुधवारी शहर बस, तसेच सार्वजनिक वाहनांतून प्रवास करावा, असा निर्णय टपाल खात्याने घेतला आहे.
सार्वजनिक वाहनांतून प्रवास करून इंधन बचत करण्याचे आवाहन केंद्रीय पेट्रोलियममंत्री विरप्पा मोईली यांनी गेल्यावर्षी केले होते. त्यानुसार टपाल खात्याने हा निर्णय घेतला आहे. दर बुधवारी बस, शहर बससेवा किंवा चार -पाच कर्मचा-यांनी मिळून रिक्षातून प्रवास करून इंधन बचत करून प्रदूषण कमी करण्यास हातभार लावावा, असे आवाहन टपाल खात्याचे मुंबई येथील मुख्य डाक महाध्यक्ष यांनी कर्मचा-यांना केले आहे. परदेशातून होणा-या इंधन आयातीवर देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होते, तसेच प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे टपाल
खात्याने इंधन बचतीचा निर्णय घेतला आहे. हे आवाहन आहे, कर्मचा-यांनी सार्वजनिक वाहनांचा वापर केला नाही, त्यांना शिक्षा केली जाणार नाही. पण वरिष्ठांपासून कनिष्ठ कर्मचा-यांपर्यंत आठवड्यातून एकदा तरी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. ज्यामुळे प्रदूषणाला थोड्याफार प्रमाणात आळा बसेल, असे टपाल खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कर्मचा-यांकडून अपेक्षा
या उपक्रमास गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या उपक्रमाला कर्मचारी प्रतिसाद देतील, अशा विश्वास वरिष्ठ पोस्टस्मातर धस यांनी व्यक्त केला. कर्मचा-यांकडून अपेक्षा या उपक्रमास गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या उपक्रमाला कर्मचारी प्रतिसाद देतील, अशा विश्वास वरिष्ठ पोस्टस्मातर धस यांनी व्यक्त केला.
उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे सामाजिक बांधिलकी म्हणून टपाल खात्याने सुरू केलेल्या या उपक्रमात अधिकारी, कर्मचा-यांनी सहभाग घ्यावा. यासाठी सक्ती नसून एक विधायक कार्य म्हणून ऐच्छिक सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा. याद्वारे मोठ्या प्रमाणात इंधन बचत होणार नाही. पण यात सहभागी होणे हे कितीतरी महत्त्वाचे आहे.’’
एस. एस. शिरसी, प्रवर अधीक्षक, डाकघर.
उपक्रमाचे रूपांतर चळवळीत व्हावे
प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी, तसेच इंधन वाचवण्यासाठी टपाल खात्याने हा उपक्रम हाती घेतला आहे. सिग्नलवर वाहने बंद करावीत, यामुळे इंधनाची बचत होऊ शकेल. या उपक्रमामुळे आर्थिक बचतही होईल. याचे अनुकरण सर्वांनीच करावे. म्हणजे या चांगल्या व विधायक उपक्रमाचे चळवळीत रूपांतर होईल.’’
आर. ए. धस, वरिष्ठ पोस्ट मास्तर, डाकघर.