आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ ६० पोस्टमन, तरीही ३६ हजार नागरिकांना सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कुरिअर सर्विसेसच्या नामांकीत कंपन्यांना मागे टाकत अकोल्याचा डाक विभाग दिवसाला ३६ हजार नागरिकांचे टपाल पोहोचते करीत आहे. यासाठी या खात्याकडे केवळ ६० पोस्टमनचे मनुष्यबळ असून शहरात सात ठिकाणी वितरण केंद्रे (पोस्ट ऑफीस) उघडण्यात आली आहेत.
दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कामगिरी बजावणारे टपाल खाते हे भारताचे अत्यंत प्राचीन विश्वसनीय माध्यम आहे. या खात्यामार्फत गटग्रामपंचायत सारख्या अत्यंत छोट्या गावापासून ते महानगरापर्यंतच्या मोठ्या शहरातील टपालाचे वितरण केले जाते. अकोला शहरात एस टी स्टँडसमोरील अकोला मुख्यालय, अकोला शहर, जठारपेठ, कृषिनगर, ताजनापेठ, गांधीनगर, शिवाजी पार्क अशा सात ठिकाणांहून डाक विभागाची सेवा प्राप्त होते. या सर्व कार्यालयांमध्ये कार्यरत पोस्टमनची संख्या ६० च्या घरात आहे. प्रत्येक पोस्टमन दररोज ६०० नागरिकांची डाक पोहोचती करतो. त्यानुसार शहरात रोज ३६ हजार टपाल वितरित केली जाते.

यामध्ये नागरिकांची नेहमीची पत्रे, रजिस्टर्ड पत्रे, व्हीपीपी, इ-मनीऑर्डर, स्पीड पोस्ट आदींचा समावेश आहे. त्यासाठी संबंधित पोस्टमन व्यक्तीश: त्या व्यक्तिपर्यंत पोहचून संबंधितांची टपाल त्यांच्या हवाली करते. यासाठी शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याला फिरावे लागते. अलिकडे अशा सेवा देणाऱ्या काही खासगी यंत्रणाही कार्यरत झाल्या आहेत. मात्र टपाल खात्याचे महत्व कायमच आहे.

बँकही सुरु होणार : ग्रामीणक्षेत्रातील दळणवळणात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे डाक खाते लवकरच बँकही सुरु करणार आहे. शासनाच्या विविध योजनांची देयके या बँकेमार्फत अदा केली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा ठिकाणी एक अशाप्रकारे संपूर्ण देशभर ही बँक उघडली जाणार आहे. सप्टेंबरअखेर ती सुरु व्हावी, असे टपाल खात्याचे निर्देश असल्याने स्थानिक कार्यालयाने तशी तयारी सुरु केली आहे.
योजनांनाही चांगला प्रतिसाद
अकोला शहरात टपाल खात्याद्वारे होते सात ठिकाणांहून टपालाचे वितरण; नागरिकांच्या हितासाठी विविध योजनाही कार्यान्वित
टपाल खात्यामार्फत नागरिकांच्या हिताच्याही योजना चालवल्या जातात. आरडी, विविध प्रकारची पत्रे टपाल तिकीटे, पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना अशी या योजनांची यादी आहे. मुख्यालयासह टपाल खात्याच्या विविध केंद्रांमार्फत या योजना राबवल्या जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संबंधित खात्याचे म्हणणे आहे.

६० पोस्टमनचेमनुष्यबळ शहरात
^टपाल खात्याच्यासर्वच कार्यालयांमधून दिली जाणारी सेवा उत्कृष्ट असावी, अशी आमची वागणूक असते. नागरिकांद्वारे वेळोवेळी त्याबाबत समाधानही व्यक्त केले जाते. दरम्यान त्याहीपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण सेवा दिली जावी, असा प्रयत्न केला जाईल.'' सीमादेशपांडे, प्रभारी वरिष्ठ पोस्टमास्टर, अकोला.
बातम्या आणखी आहेत...