आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेशासाठी मिळालेले कापड अपूर्ण अन् निकृष्ट दर्जाचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- टपाल खात्याचा मुख्य कणा समजल्या जाणार्‍या पोस्टमनकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन वर्षांसाठी गणेवशासाठी झगडणार्‍या पोस्टमनला या वर्षी गणवेशासाठी कापड मिळाले. मात्र ते अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच या वर्षी छत्री, चपलाही अद्याप मिळालेल्या नाहीत.
इंटरनेट, सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने पोस्टाचे कमी झाल्याची ओरड होत आहे. मात्र टपाल वाटपासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पोस्टमनला आजही पूर्वीइतकेच आहे. ऊन असो, वारा असो की पाऊस झेलत पोस्टमन टपाल वाटपाचे काम करतात. पोस्टमनला दरवर्षी शासनाकडून गणवेश, बॅगा, छत्री, चपला मिळतात. जिल्ह्यातील पोस्टमनला दोन वर्षांपासून गणवेश नव्हता. या वर्षी गणवेशासाठी कापड मिळाले ते केवळ अडीच मीटर आहे. अडीच मीटरमध्ये गणवेश होत नाही. मिळालेले कापड निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच पोस्टमनला जाड काड्यांपासून बनवलेल्या छत्र्या, चपला देण्याचा ब्रिटिशकालीन नियम आहे. मात्र पोस्टमन छत्र्या, चपलांचा प्रतीक्षेत आहेत. यासाठी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज पोस्टमन युनियनच्या आदेशानुसार पोस्टमन संघटनेने आठ ऑगस्टपासून काळ्या फिती लावून कामकाज करत आहे. सोमवारी (18 ऑगस्ट) प्रधान डाकघरसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
रेनकोटची मागणी
राज्य शासनाने गणवेशासाठी दिलेले कापड हलक्या दर्जाचे आहे. टपाल वितरणसाठी आम्हाला उन्हात, पावसात फिरावे लागते. पावसाळ्यात छत्री न देता रेनकोट देण्यात यावा, याची मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे. मात्र, चपला, छत्रीप्रमाणेच रेनकोटच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.’’
व्ही. एस. बोरुडे, अध्यक्ष, पोस्टमन युनियन.

पुरेसे कापड हवे...
टपाल खात्याचा राजदूत समजल्या जाणार्‍या पोस्टमनला गणवेशासाठी सरसकट अडीच मीटर कापड देण्यात आले आहे. या अडीच मीटर कापडात गणवेश होणे अशक्य आहे. प्रत्येकाच्या उंचीनुसार कापड देण्यात यावे. कापड चांगल्या प्रतीचे हवे होते. चप्पल, छत्रीही अजून मिळालेली नाही. ’’
एन. व्ही. कुलकर्णी, सचिव, पोस्टमन युनियन.

फोटो- शहरातील प्रधान डाकघरमध्ये विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून कामकाज करताना पोस्टमन.