आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आता तरी मनपा प्रशासनाला जाग येईल का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीगेटसमोरच्या वळणावर रस्त्यालगतच असलेल्या या खड्डय़ावर धोक्याची सूचना देणारा फलक नसल्याने या खड्डय़ात सोमवारी दुपारी पुण्याहून नगरला येत असलेली कार अडकली. या कारमध्ये वृद्धेसह पाच जण होते. सुदैवाने कार खड्डय़ात गेली नाही. नागरिकांनी ही कार बाहेर काढण्यासाठी मदत केली. पंधरा दिवसांपूर्वीच आयुक्त विजय कुलकर्णी यांनी या ठिकाणी भेट देऊन या खड्डय़ाची पाहणी केली होती. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच मनपा प्रशासनाला हा खड्डा बुजवण्याची जाग येईल का? असा सवाल नगरकर करीत आहेत. या खड्डय़ाबद्दल ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारच्या अंकात फोटो प्रकाशित करून मनपाचे लक्ष वेधले होते. छाया : कल्पक हतवळणे