आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Power Minister Chandrashakhar Bavankule Comment Electricity Reserve Water Give To Field And Drunk

वीजनिर्मितीसाठीचे राखीव पाणी शेती, पिण्यासाठी- ऊर्जामंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- ‘राज्यातीलवीज तुटवडा संपुष्टात आल्याने अाता वीजनिर्मितीसाठी अारक्षित करण्यात अालेल्या काेयनेसह इतर धरणातील पाणी पिण्यासाठी शेतीसाठी वापरण्यात येणार आहेत. भविष्यात उद्योगांसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करावा लागेल’, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.

शिर्डीत साईदर्शनानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील वीज चाेरी राेखण्यासाठी येत्या महिन्यात १२ जणांचे भरारी पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. हे पथक राज्यातील वीज चोरी, गळती, कर्मचारी आदींबाबत कारवाया करण्याबरोबरच आॅडिटचेही काम करेल. यापुढे वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करून त्याला पुन्हा वीज जोडणी देताना मदत करणाऱ्या तांत्रिक व्यक्तीचे नाव प्रतिज्ञापत्राद्वारे घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

कमी वीज जादा पाणी देणारे तसेच दूरवरून नियंत्रित करता येतील असे अत्याधुनिक शेती पंप राज्यात बसवण्यात येणार आहेत. भविष्यात ४० लाख शेती पंपही बदलले तर हजारो मेगावॅट वीज वाचेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

साई समाधी शताब्दीकरिता विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. शिर्डी शहरातील वीज प्रश्न एलईडी पथदिवे बसवण्याबाबत मे रोजी बैठक आहे. शताब्दीपूर्वी विजेबाबतच्या समस्या संपुष्टात आणू, अशी ग्वाहीही बावनकुळे यांनी दिली.