आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pramod Kamble Paintings Publication Issue At Nagar, Divya Marathi

चित्रकार प्रमोद कांबळेंचा कला शिबिराचा उपक्रम स्तुत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रमोद कांबळे यांनी आत्मसात केलेली चित्रकला, शिल्पकला व कलाक्षेत्रातील इतर बाबी शिबिराच्या माध्यमातून इतरांना शिकवण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या शिबिराच्या माध्यमातून कल्पक व नावीन्यपूर्ण कलाकृती घडाव्यात, तसेच भविष्यातील महान कलावंतही नगर जिल्ह्यातून घडावेत, अशी अपेक्षा मुंबई येथील प्रसिद्ध कलावंत विजय मोहन यांनी व्यक्त केली.
येथील कलाजगत अ‍ॅकॅडमी ऑफ फाइन आर्ट्सतर्फे आयोजित उन्हाळी कला शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुंबई येथील प्रसिद्ध कलावंत नागराज चारी, आदित्य चारी, शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे, पुणे येथील चित्रकार व तुलसी आटर््सचे संचालक सुरेश लोणकर, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, कलाजगतच्या संचालिका स्वाती कांबळे, शुभंकर कांबळे व मोना कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
आदित्य चारी यांनी शिबिरार्थींना कलाकृतींचे मोजमाप, छाया-प्रकाशाचा वापर, रंगांचा प्रभाव, तसेच कलाकृती तयार करण्यासाठी वापरता येणारे साहित्य याबाबत प्रात्याक्षिकासह माहिती दिली. त्यांनी या वेळी प्रमोद कांबळे यांचे पेन्सिलचित्रही रेखाटले.

प्रारंभी प्रतिमापूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रमोद कांबळे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. कवी संजीव तनपुरे यांनी सूत्रसंचालन केले. भगवान राऊत यांनी आभार मानले. या शिबिरास जिल्ह्यातील शिबिरार्थींचा उदंड प्रतिसाद लाभला. हे शिबिर 25 मे ते 8 जून या कालावधीत होणार असून शिबिरार्थींना कलर अ‍ॅप्लिकेशन, मास्क मेकिंग, स्टोन पेंटिंग, प्लेट पेंटींग, न्यूजपेपर फ्रेम मेकिंग, शिल्पकला, चित्रकला, व्यक्तिचित्र, रेखाचित्र, पोस्टर पेंटिंग, निसर्गचित्र आदी कला शिकवल्या जाणार आहेत.