आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेबल फॅनपासून तयार केला एअर कुलर; ओझर येथील प्रसाद जाधव यांचे संशोधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- घरातील पंखा आणि तांब्याच्या धातूच्या नळीचा वापर करून एअर कुलर ओझर मिग (जि. नाशिक) येथील व्यावसायिक प्रसाद जाधव यांनी तयार केला आहे. हा मिनी एसी ३०० स्क्वेअर फुटांच्या खोलीचे तापमान ते १० अशांपर्यंत कमी करते, असा दावा प्रसाद जाधव यांनी आपल्या शोधाबद्दल केला आहे.
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील रहिवासी प्राथमिक शिक्षक राजेंद्र उकिरडे यांचे जाधव हे मेव्हणे आहेत. उकिरडे यांच्या घरी जाधव यांनी हा एसी तयार करून दिला. "दिव्य मराठी'शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जाधव यांचे शिक्षण एमए (सायकाॅलाॅजी) एमबीए असून त्यांनी कोणतेही तांत्रिक किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले नाही.

प्रचलित कुलर हे पाण्याला हवेमधून बाष्पीभवन करून हवेमधील आर्द्रता वाढवते. ज्याने दमा असणाऱ्या लोकांना कुलरची हवा सहन होत नाही. या उपकरणाने अशा रुग्णांना त्रास होत नाही. या पद्धतीने पाण्याद्वारे फक्त गारवा हवेत पसरवला जातो. हिवाळ्यात याच नळीतून गरम पाणी फिरवले, तर तो रूम हिटरचेही काम करेल, असा जाधव यांचा दावा आहे. जाधव यांनी यापूर्वीही वेगवेगळे संशोधन केलेले आहे. या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

एसी पर्यावरणपूरक
याएसीमध्ये एका बादलीत बर्फ, थंड पाणी आणि मीठ यांचे मिश्रण ठेवून त्यास काॅपरच्या नळीतून फिरवले आहे. जे पंख्याच्या माध्यमातून थंड हवा पास करते. हे उपकरण पर्यावरणपूरक अाहे. त्यात तेच तेच पाणी आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो, असे संशोधक प्रसाद जाधव यांनी सांगितले.