आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratap Dhakane News In Marathi, BJP, Nagar Lok Sabha Constituncy, Divya Marathi

भाजपच्या संकेतस्थळावर अजूनही जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवरून पक्षत्याग करणारे अँड. प्रताप ढाकणे हे भाजपच्या संकेतस्थळावर अजूनही जिल्हाध्यक्ष म्हणून आहेत. लोकसभेची उमेदवारी देताना विश्वासात न घेतल्याने नाराज झालेले भाजपचे जिल्हाध्यक्ष ढाकणे यांनी 11 मार्चला पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ढाकणे पाथर्डीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत दाखल झाले. शुक्रवारी ढाकणे यांनी भाजपला राम-राम करून महिना झाला. मात्र, भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर जिल्हाध्यक्ष म्हणून ढाकणे यांचेच नाव आहे.