आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratap Dhakane News In Marathi, Lok Sabha Election, Nagar, Divya Marathi

प्रताप ढाकणे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - जांभळी येथे विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. प्रताप ढाकणे व माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला. आम आदमी पक्षाचे तालुका संघटक किसन आव्हाड यांनी याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार दिली होती.
जांभळी येथे मंगळवारी (8 एप्रिल) दिनकर पालवे यांची ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभा झाली. यावेळी ढाकणे त्यांच्याबरोबर होते. या सभेसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतलेली नव्हती, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नंतर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल डी. बी. काकडे करत आहेत