आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratap Dhakane News In Marathi, Nationalist Congress, Gopinath Munde

मोठे करता आले नाही, तर अपमानित तरी करू नका, ढाकणे यांची मुंडे यांच्यावर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - बारा वर्षे तिकडे श्वास कोंडला होता. बहुजन समाजाची भाषा बोलणारे, केवळ टीकात्मक विचारसरणी ठेवून ओबीसीचे नेते स्वत:ला म्हणवत आहेत. उषा दराडे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना पवारांनी आमदार केले. तुम्ही (मुंडे) एकतरी माणूस मोठा केला का? मोठे करता आले नाही, तर अपमानित करू नका, अशी टीका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर बोलताना केली.


या वेळी पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे, महिला आघाडी अध्यक्ष विद्या चव्हाण, आमदार बबनराव पाचपुते, घनश्याम शेलार, माजी आमदार पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते. सभेपूर्वी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांची भेट घेतली.


ढाकणे म्हणाले, राजीव राजळे, चंद्रशेखर घुले व ढाकणे एकत्र आल्यावर मताधिक्य मिळणार आहे. नगर जिल्हा पवारांचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होईल. प्रास्ताविक आमदार चंद्रशेखर घुले, स्वागत राजळे यांनी केले. आभार नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी मानले.


मुंडेविरोधाची धार कमी; कार्यक्रम शांततेत
खासदार गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. मुंडे यांच्या विरुद्ध काही वक्तव्य झाले, तर प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत एक गट सभास्थानी होता. याची कुणकुण पोलिसांना लागल्यावर त्यांनी योग्यरीत्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना याची माहिती दिली. पवार यांनीही आपल्या भाषणात मुंडेवर टीका करण्याचे टाळले. त्यामुळे कार्यक्रम शांततेत पार पडला. पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त या वेळी ठेवला होता.


भीमराव फुंदेंनी घेतली तावडेंची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमराव फुंदे यांनी मंगळवारी नगर येथे आपल्या सर्मथकांसह भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी यासंदर्भात शिष्टाई केली. पाथर्डीत नऊ एप्रिलला गोपीनाथ मुंडे यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी आमदार पंकजा मुंडे यांचा तालुका दौरा होणार आहे.