आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रस्टचा निर्णय मान्य नसेल तर त्यांनी न्यायालयात जावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भगवानगडाचा वाद आपसात मिटवावा, नाहक समाजाला वेठीस धरू नये. कुणीही हा प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये. विश्वस्त मंडळाने घेतलेला निर्णय ज्यांना मान्य नाही, त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी नाव घेता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे गडाचे महंत नामदेवशास्त्री यांना रविवारी दिला.
नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ढाकणे बोलत होते. भगवानगडाकडे कोणीही राजकीय भूमिकेतून पाहू नये. भगवानबाबांना जे मानतात, त्यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवानबाबांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल,असे काम करु नये. ही प्रत्येक भक्ताची जबाबदारी आहे. दसऱ्याच्या दिवशी गडावर प्रत्येकजण आपले वर्तन चांगले ठेवेल, अशी अपेक्षा ढाकणे यांनी व्यक्त केली.
भगवानगड हा ट्रस्ट आहे. तेथे कुणाला येऊ द्यायचे, कुणाला येऊ द्यायचे नाही, हा अधिकार विश्वस्त मंडळाचा आहे. हा वाद दोघांनी आपसात मिटवावा. नाहक समाजाला वेटीस धरु नये. वाद कशावरुन आहे, हे त्या दोघांनाच माहित असेल. त्यामुळे यावर मी काय भाष्य करू, असेही ढाकणे म्हणाले. हा वाद इतका टोकाला जाईल, असे वाटले नाही. ज्यांच्यात वाद आहे ते दोघेही ज्ञानाने, बुध्दीने सक्षम आहेत. धर्म आणि सत्ता कधीच एकत्र येऊ शकत नाही. धर्म हा धर्माच्या जागेवर असतो, सत्ता ही सत्तेच्या जागेवर असते. माणसाने कसे वागावे हे धर्म शिकवतो. सत्तेचा वापर लोकांच्या कल्याणासाठी कसा करायचा हे सत्ता शिकवते, असेही ढाकणे म्हणाले.
भगवानगडाच्या विश्वस्त मंडळाने घेतलेला निर्णय ज्यांना मान्य नाही, त्यांनी न्यायालयात जावे. ही लोकशाही आहे. सर्वांना अधिकार आहे. खोट्या प्रतिष्ठेचे काम बंद करा. भगवानबाबांचे जे खरे भक्त आहेत, ते या वादात कधीच पडत नाहीत. गडावर उद्या काही अनुचित प्रकार घडू नये, या काळजी घेतली पाहिजे. काही प्रकार घडल्यास येणारा काळ माफ करणार नाही. गडाचा वाद हा आता मार्ग निघण्याच्या पलीकडे गेला आहे. गडावर येणाऱ्या भक्तांचे शांततेत दर्शन झाले पाहिजे, असे ढाकणे यांनी सांगितले.

राजकीय अस्तित्वाची ही लढाई असल्याचे सांगून ढाकणे म्हणाले, राजकीय अस्तित्व हे आपल्या बुध्दी कर्तृत्वाने तयार होते. या मुद्द्यावर कुणाचाही राजकीय फायदा होणार नाही. गडामुळे गोपीनाथ मुंडे यांचे अस्तित्व होते असे म्हणता येणार नाही. मुंडे हे स्वत:च्या कर्तृत्वावर मोठे झाले. भगवानबाबांच्या विचारांना पराभूत करण्यासाठी रचलेले हे षडयंत्र आहे. महापुरुष हे कुठल्या जाती-धर्माचे नसतात. ते सर्वांचे असतात. बाबांचे महान कार्य हे चौकटीत बांधणे अयोग्य आहे, असे मत ढाकणे यांनी व्यक्त केले.

साहेबांनी तेव्हाच सांगितले होते...
भगवानगडावर राजकीय भाषणे होऊ देऊ नका, अशी भूमिका काही वर्षांपूर्वी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी मांडली होती. अशा भाषणामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. आता तेच उभे राहिले आहे, असे प्रताप ढाकणे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...