आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratap Dilip News In Marathi, Nationalist Congress, Rajiv Rajale, Divya Marathi

‘पाथर्डीचा बॅकलॉग भरण्यासाठी राजळे यांना लोकसभेत पाठवा’ - प्रताप ढाकणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - पाथर्डी तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राजीव राजळे यांना लोकसभेत पाठवा. आमदार चंद्रशेखर घुले, राजीव राजळे व आपण तालुक्यातील पूर्व भागाच्या विकासाला चालना देऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केला.
राजळे यांच्या प्रचारासाठी सोमवारी ढाकणे यांनी 15 गावांचा दौरा केला. वडगाव येथे कार्यकर्त्यांपुढे ते बोलत होते. ढाकणे म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांना पवारांनी न्याय दिला. फळबाग योजना, अश्वशक्तीप्रमाणे कृषिपंपाचे बिल, ऊस, कापूस या पिकांना हमीभाव, शेततळे असे निर्णय पवारांनी घेतले. लोकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी हाच उत्तम पर्याय वाटल्याने आपण तो निवडला. गांधींएवढा निष्क्रिय खासदार आपण आजपर्यंत पाहिला नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र खेडकर, तर आभार जनार्धन वांढेकर यांनी मानले.