आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Precaution For Rebellioner, Baban Pachpute Information

बंडखोरी होऊ नये यासाठी खबरदारी, बबन पाचपुते यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल, तर निवडणुकीत बंडखोरी करू नये. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पक्षाला या मतदारसंघातील लोकसभेची एक व विधानसभेच्या दोन जागा गमवाव्या लागल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. शरद पवार आमचे दैवत आहेत, ते जो उमेदवार ठरवतील, तो मान्य करू. राजीव राजळेंना उमेदवारी दिल्यास मी स्वत: उभा राहीन. त्यापेक्षा जास्त काम करीन, असे वक्तव्य नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आमदार बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केले.


शेवगाव येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाचपुते बोलत होते. पाचपुते म्हणाले, जोपर्यंत केलेल्या कामाची तुलना होत नाही, तोपर्यंत कामाचे महत्त्व पटत नाही. यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्ह्यात 1174 कोटींची कामे केली. जिल्ह्यातील जनतेने दुष्काळ पाहिला. मात्र, जाणवू दिला नाही. राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो. शरद पवारांनी येत्या लोकसभा निवडणुकीची नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपणावर सोपवल्याने मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करून उमेदवारीसाठी आपण सुरुवातीपासूनच इच्छुक नव्हतो. विक्रमसिंहसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणानुसार पक्षर्शेष्ठींच्या आदेशाने काम करण्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पंचायत समिती उपसभापती अरुण लांडे, संपतराव नेमाणे, पद्मा पाठक, एजाज काझी, प्रकाश वाघमारे आदी उपस्थित होते.