आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prefer Sato's Men With Traditional Drum Dijela Branch Mayor

डिजेला फाटा देऊन पारंपरिक ढोल पथकांना प्राधान्य द्यावे - महापौर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पारंपरिक वाद्यांमुळे भारतीय संस्कृती टिकून आहे. ढोलपथकांद्वारे रिदम प्रतिष्ठान संस्कृतीचे जतन करत आहे. डीजेमुळे नागरिकांना त्रास होतो. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी डिजेला फाटा देऊन भारतीय पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलपथकांना प्राधान्य द्यावे, असे महापौर अभिषेक कळमकर म्हणाले.

रिदम प्रतिष्ठानच्या वादन सरावाच्या शुभारंभप्रसंगी कळमकर बोलत होते. यानिमित्त बोल्हेगावफाटा येथील साई इंग्लिश स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास कोहिनूरचे संचालक अश्विन गांधी, ए. एम. रिअॅलिटीजचे संचालक गिरीश अग्रवाल, रिदम नगरी ढोल पथकाचे अध्यक्ष राहुल शेलार प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

महापौर कळमकर म्हणाले, प्रत्येकजण समाजाचे काही देणे लागतो. प्रतिष्ठानने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने समाजात चांगल्या प्रकारचा संदेश गेला आहे. तरुण पिढी भारतीय पारंपरिक वाद्यांकडे आकर्षित होत आहे ही चांगली बाब आहे. गणेशोत्सवातील सरावाचा प्रारंभ महापौर कळमकर यांच्या हस्ते ढोलचे पूजन करून झाले. आभार राहुल शेलार यांनी मानले.
रिदम प्रतिष्ठानच्या रिदम नगरी ढोल पथकाच्या वादन सरावाचा प्रारंभ ढोलचे पूजन करून करताना महापौर अभिषेक कळमकर.