आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती महिलेचा मृत्यू; डॉक्टरवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेवर निष्काळजीपणे सिझेरियन शस्त्रक्रिया केल्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू झाला. ही घटना नऊ महिन्यांपूर्वी घडली असली, तरी कोतवाली पोलिसांनी ६ जानेवारीला याप्रकरणी गुन्हा नोंदवला.
महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नाथ हॉस्पिटलचे डॉ. संदीप बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर बापू कोहक (२९, केळपिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. २३ मार्च २०१४ रोजी त्यांची पत्नी शुभांगी (२० वर्षे) टिळक रस्त्यावरील नाथ हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी आली होती. सिझेरियन करताना निष्काळजीपणा झाल्यामुळे अति रक्तस्त्राव झाला. त्यामुळे शुभांगीला आनंदऋषी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोतवाली ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.