आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीमियर लीगमध्ये ‘आत्मा मालिक’च्या संघाला विजेतेपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव- विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाच्या आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमीतर्फे 8 व 9 ऑगस्‍ट रोजी आत्मा मालिक प्रीमियर लीगचे (क्रिकेट) आयोजन करण्यात आले होते. या लीगमध्ये आत्मा मालिक करिअर अकॅडमीच्या ऑफिसर संघाने विजेतेपद पटकावले. या संघाने अंतिम सामन्यात आत्मा स्पेशल संघाचा 15 धावांनी पराभव केला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थी व शिक्षक यांच्या 32 संघांनी सहभाग घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आत्मा मालिक करिअर अकॅडमीच्या ऑफिसर संघाने निर्धारित षटकांत 80 धावा फटकावल्या. 81 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला आत्मा स्पेशल शिक्षक संघाला ऑफिसर संघाच्या भेदक माºयापुढे 8 बाद 65 धावापर्यंतच मजल मारता आली. आत्मा स्पेशल संघाला उपविजेतेपद, तर उच्च माध्यमिक गुरुकुल विद्यार्थी संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्याचा सामनावीर व मालिकावीरचा पुरस्कार ऑफिसर संघाचा गणेश भडांगे याने पटकावला. आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ व्यवस्थापक सुरेश भणगे, प्राचार्य निरंजन डांगे, माणिकराव जाधव, संदीप गायकवाड आदींच्या हस्ते सामनावीर व मालिकावीर पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. विजेत्या, उपविजेत्या आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिके व चषक स्वातंत्र्य दिनाच्या (15 ऑगस्‍ट) कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आला. या प्रीमियर लीग (क्रिकेट) स्पर्धेच्या यशस्वितेसाठी क्रिकेट अकॅडमीचे संदीप शिंदे संदीप बोळीज यांनी परिश्रम घेतले. या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांचे समालोचन अशोक कांगणे व रवींद्र जानराव यांनी केले.