आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची तयारी पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील ६८ धार्मिक स्थळे पहिल्या टप्प्यात हलवण्याची तयारी केली आहे. पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस बंदोबस्त मागवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला जाणार आहे, अशी माहिती मनपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली. 
 
महापालिका हद्दीत रस्त्याला अडथळा निर्माण करणारी १०४ धार्मिक स्थळे आहेत. पहिल्या टप्प्यात १९६० नंतर निर्माण झालेली ६८, दुसऱ्या टप्प्यात १९६० पूर्वीच्या ३१ तर तिसऱ्या टप्प्यात पाच धार्मिक स्थळांवर कारवाई होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६८ धार्मिक स्थळे कोणत्याही क्षणी हटवली जाणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत शहरातील रस्त्यांना अडथळे ठरणारी धार्मिक स्थळे हटवावी लागणार आहेत. धार्मिक स्थळे असल्याने शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मनपाने मागील वर्षी चार धार्मिक स्थळे हटवली आहेत. ३१ स्थळांबाबत महापालिकेने राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. पाच स्थळे खासगी जागेत आहेत. पालिकेच्या चार प्रभागानिहाय यादी तयार करण्यात आली. इथापे म्हणाले, पहिल्या टप्प्यात ६८ ठिकाणे निष्काशित करण्याची तयारी झाली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...