आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते उद्या ‘एसीसीएस’ला ध्वजप्रदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शनिवारी नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलला ध्वजप्रदान केला जाणार आहे. यानिमित्ताने आर्मर्ड कोअरच्या इतिहासात या दुर्मिळ गौरवाच्या क्षणाची नोंद होणार आहे. सकाळी विशेष संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय राष्ट्रपतींच्या हस्ते या विशेष दिनाच्या कव्हरचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ध्वजप्रदानाच्या कार्यक्रमालाच ‘कलर प्रेझेंटेशन’ म्हटले जाते.
 
राष्ट्रपती तिन्ही दलांचे सर्वोच्च सेनापती असतात. त्यांच्या हस्ते लष्कराच्या एखाद्या विभागाला ध्वजप्रदान करण्याचा क्षण हा अतिशय दुर्मिळ गौरवाचा असतो. जो विभाग युद्ध शांततेच्या काळात अतूलनीय निष्ठा बहुमोल योगदान देत अतिशय मोलाची कामगिरी बजावतो, त्यालाच हा गौरव प्रदान केला जातो. ‘एसीसीएस’चे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित (सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक) हा दुर्मिळ सन्मान स्वीकारणार आहेत. एसीसीएसमध्ये आपल्या वरिष्ठ कनिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह मित्र देशांतील अधिकाऱ्यांना अतिशय उच्च दर्जाचे लष्करी प्रशिक्षण दिले जाते. रणगाडा हा लष्कराचा कणा मानला जातो.

ब्रिटिशांच्या काळात एसीसीएस ‘घोडदळ’ (कॅव्हलरी) होते. आता ‘एसीसीएस’चे मुख्य हत्यार रणगाडा आहे. लष्करी इतिहासात झोझिला खिंड, चाविंडा, खेमकरण, फिलोरा येथील रणगाड्यांच्या युद्धांत भारतीय लष्कराचे विजय अजरामर मानले जातात. यात आर्मर्ड कोअरची भूमिका प्रमुख होती. यात लढलेल्या शूर अधिकाऱ्यांना एसीसीएसमध्येच प्रशिक्षण मिळाले होते. याआधी नगरच्या मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटर सेंटरला (एमआयआरसी) राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या हस्ते हा सन्मान मिळाला होता. आता नगरमधील दुसऱ्या लष्करी विभागाला हा सन्मान प्रदान करण्यासाठी राष्ट्रपती नगरमध्ये येणार आहेत.
 
ध्वजप्रदानाचे महत्त्व
लष्करातध्वज अतिशय महत्त्वाचा असतो. राष्ट्रध्वजाबरोबरच प्रत्येक लष्करी विभागाचा स्वतंत्र ध्वज असतो. पूर्वीच्या काळात ध्वज पडला, की पराभव मानला जायचा. आता ध्वज प्रतीकापुरता उरला असला, तरी सैनिकांना तो स्फूर्ती प्रेरणा देत असतो. त्यामुळे सर्वोच्च सेनापतींच्या हस्ते ध्वजप्रदान करण्याच्या हा क्षण आर्मर्ड कोअरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. या निमित्ताने नगरमध्ये अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे नगरमध्ये तळ ठोकून आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...