आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसीसीएस’च्या इतिहासात गौरव क्षणाची नोंद,लष्कराच्या काही वेगळ्या परंपरांचा उपस्थितांना आला अनुभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रपतीप्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलला ध्वज प्रदान करण्यात आला. त्यामुळे ‘एसीसीएस’च्या इतिहासात शनिवारी अतिशय दुर्मिळ अशा गौरवाच्या क्षणाची नोंद झाली. या निमित्ताने सकाळी विशेष भव्य संचलनाचे आयोजन करण्यात आलेे. ध्वज प्रदान करण्याचा सोहळा त्या-त्या लष्करी विभागाच्या इतिहासात एकदाच होतो. त्यामुळे अतिशय शानदार संचलन सादर करण्यात आले. ध्वज प्रदानाच्या कार्यक्रमाने लष्कराच्या काही वेगळ्या परंपरांचा अनुभव उपस्थितांना आला. 
 
राष्ट्रपती तिन्ही दलांचे सर्वोच्च सेनापती आहेत. त्यांच्या हस्ते लष्कराच्या एखाद्या विभागाला ध्वज प्रदान करण्याचा क्षण हा अतिशय दुर्मिळ गौरवाचा असतो. जो विभाग युद्ध शांततेच्या काळात अतूलनीय निष्ठा बहुमोल योगदान देत अतिशय मोलाची कामगिरी बजावतो, त्यालाच हा गौरव प्रदान केला जातो. ‘एसीसीएस’चे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित (सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक) यांनी हा दुर्मिळ सन्मान स्वीकारला. 

त्याआधी शानदार संचलन सादर करण्यात आले. त्यात २०० जवान आणि १९ अधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या संचलनाचे कमांडर होते, ब्रिगेडिअर संदीप झुंजा. ‘एसीसीएस’च्या डीएमआर रेजिमेंटच्या जवळ असलेल्या युद्धस्मारका समोरच्या मैदानात हे संचलन मुख्य कार्यक्रम झाला. रणगाडा हा लष्कराचा कणा मानला जातो. आता ‘एसीसीएस’चे मुख्य हत्यार रणगाडा आहे. त्यामळेे या संचलनात १२ रणगाडे सहभागी झाले होते. त्यांत टी ७२ (अजेय), टी-९० (भिष्म) अर्जुन ब्रिटिशांच्या काळात एसीसीएस ‘घोडदळ’ (कॅव्हलरी) होते. लष्करी इतिहासात यांत आर्मर्ड कोअरची भुमिका प्रमुख होती. यात लढलेले शूर अधिकाऱ्यांना एसीसीएसमध्येच प्रशिक्षण मिळाले होते. या सर्व योगदानाबद्दल हा सन्मान बहाल करण्यात आला. 

ध्वज प्रदानाचा कार्यक्रम त्या लष्करी विभागाच्या इतिहासात एकदाच होत असल्याने अतिशय शानदार संचलन सादर करण्यात आले. संचलनाची सुरुवात परेड अॅड्ज्युटंट लेफ्टनंट कर्नल यशवंतसिंह राणावत यांनी मैदानात केली. त्यानंतर परेड सेकंड कमांड कर्नल सुकेश वर्मा (शौर्य पदक) यांनी संचलनाची सुत्रे हाती घेतली. त्यानंतर मग त्यांनी ही सुत्रे ब्रिगेडिअर संदीप झुंजा यांच्याकडे सोपवली. संचलनाची पहिली सलामी कमांडंट दीक्षित यांनी स्वीकारली. त्यानंतर अनुक्रमे लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, लेफ्टनंट जनरल पी. एम. हरिज, लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी, तर राष्ट्रपती मुखर्जी यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली. त्यानंतर उघड्या जीपमधून मुखर्डी यांनी संचलनाचे निरीक्षण केले. 
 
त्यानंतर ध्वज प्रदान करण्याची कार्यवाही सुरू झाली. सर्वांत प्रथम संचलन करणाऱ्या जवानांनी ‘पवित्र चौकोन’ तयार केला. त्यानंतर बँड पथकातील ड्रमर्स मैदानात आले. त्यांनी ध्वज ठेवण्यासाठी ड्रमचा चौथरा तयार केला. त्यांनी मैदान सोडल्यावर ध्वज मैदानात आणण्यात आला. या ध्वजाला कव्हर होते. ते काढल्यानंतर ध्वज ड्रमच्या चौथऱ्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर हिंदू, मुस्लिम, शिख ख्रिस्ती धर्मगुरूंचे मैदानात आगमन झाले. मंत्रोच्चार प्रार्थनेसह ध्वज ‘पवित्र’ करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनी तो ध्वज लेफ्टनंट जनरल सोनी यांच्याकडे सोपवला. त्यावेळी कमांडंट दीक्षित उपस्थित होते. 

त्यानंतर संचलनाचे शेवटचे सत्र सुरू झाले. ध्वजाचा ताबा ध्वज तुकडीने घेतला. त्यानंतर जवान, घोडेस्वार, रणगाडे यांनी संचलन करत सलामीमंचाकडे येत राष्ट्रपतींना सलामी दिली. त्यावेळी तीन हेलिकॉप्टरनी राष्ट्रध्वज फडकावत संचलनात भाग घेतला. त्यानंतर तीन सुखोई विमानांनीही संचलनाच्या मैदानावरून फेरी मारली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या संचलनाला अर्व अधिकारी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 

कार्यक्रम स्मरणीय करण्यासाठी डाक विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘फर्स्ट डे कव्हर’चे प्रकाशन यावेळी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुखर्जी यांनी ट्रेनिंग स्कूल परिसरातील प्रदर्शनाला भेट दिली. 

ध्वजरक्षणास तुकडी 
ध्वजप्रतिकापुरता उरला असला, तरी सैनिकांना तो स्फुर्ती प्रेरणा देत असतो. त्यामुळे सर्वोच्च सेनापतींच्या हस्ते ध्वजप्रदान करण्याच्या हा क्षण आर्मर्ड कोअरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे. युद्धामध्ये या ध्वजाच्या रक्षणासाठी १२० जवानांची तुकडी असेल. ती कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली असेल. त्यात दोन लेफ्टनंट कर्नल दर्जाचे अधिकारीही असतील. 

कामगिरी हाच निकष 
‘एसीसीएस’लाहा ध्वज प्रदान करण्याचा सन्मान मिळण्यामागे युद्धासह शांततेच्या काळात उत्कृष्ट आणि कौतुकास्पद कामगिरी कारणीभूत आहे. देशातील सैनिक आणि मित्र राष्ट्राच्या सैनिकांना अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘एसीसीएस’ जगभरात प्रसिद्ध आहे. ‘एसीसीएस’च्या आधीच्या पराक्रमी घोडदळाला दोन व्हिक्टोरिया क्रॉस, दोन परमवीर चक्र, १६ महावीर चक्र, ५२ वीर चक्रांनी सन्मानित केले. 
 
संचलनानिमित्त सुखोई विमानांची भरारी. छायाचित्रे : मंदार साबळे 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा हे छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...