आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Press Conference Of Congress rashtrawadi Congress Councillors

मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - "मूलभूत'च्या ४० कोटींच्या निधीवरील स्थगिती उठवली नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. आधी आम्ही लोकशाही मार्गाने म्हणणे मांडू्. प्रश्न सुटला नाही, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करणार असल्याचे या नगरसेवकांनी स्पष्ट केले.
युतीच्या काही विरोधकांनी शासनाकडे तक्रार करून मूलभूतच्या ४० कोटींच्या कामाला स्थगिती मिळवली. या प्रकरणावरून मागील तीन-चार दिवसांपासून युती-आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी महापौर अभिषेक कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका कार्यालयात मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले, नगरसेवक कैलास गिरवले, सुनील कोतकर, संपत बारस्कर, विपुल शेटिया, स्वप्निल शिंदे, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर आदी उपस्थित होते.

महापौर कळमकर म्हणाले, ४० कोटींच्या कामात खोडा घालण्याचे काम विरोधकांनी केले आहे. पैशांची भाषा करणाऱ्या विरोधकांनी यापूर्वी सत्ता भोगलेली आहे. आधी बोगस कामांचा मुद्दा आता फेज टूच्या कामास प्राधान्य देण्याचा मुद्दा पुढे करत विरोधकांनी चांगल्या कामात खोडा घातला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून सत्य परिस्थिती निदर्शनास आणून दिली जाणार असल्याचे कळमकर यांनी सांगितले.

सभापती भोसले म्हणाले, ज्येष्ठ नगरसेवक अॅड. अभय आगरकर यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. शासनानेदेखील चार लोकांच्या तक्रारीवर कोणतीही शहानिशा करता ४० कोटींच्या निधीला स्थगिती दिली. तीन-चार रस्ते सोडले, तर सर्व भागात फेज टूचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मूलभूतची कामे करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपोषणाला बसणार
काही मोजक्या विरोधकांच्या सांगण्यावरून शासनाने ४० कोटींच्या कामांना स्थगिती दिली. ही स्थगिती उठवली नाही, तर वेळप्रसंगी आम्ही सर्व नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहोत. यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निधीवरील स्थगिती उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे माजी नगरसेवक निखिल वारे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

फेज टूशी केडगावचा काय संबंध?
^केडगावसाठी मूलभूत मधूनकोटींची कामे प्रस्तावित होती. पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या निधीतून रस्त्यांची कामे मार्गी लागणार होती. विरोधकांच्या आडमुठ्या धोरणाचा केडगावकरांनाही फटका बसला. फेज टूशी केडगावचा काहीच संबंध नाही. तेथील कामांना त्यामुळे खीळ बसणार अाहे. विरोधकांनी चुकीचे राजकारण करून केडगावच्या नागरिकांना वेठीस धरू नये.'' सुनील कोतकर, नगरसेवक.