आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्रकारांनी घातला जिल्हा माहिती अधिकार्‍यांना घेराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांना महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ व शहर प्रेस क्लबतर्फे घेराव घालण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व बहुजन पत्रकार संघाचे शहराध्यक्ष प्रा. सुभाष चिंधे यांनी केले. पत्रकार संरक्षण कायदा तत्काळ करावा, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी, अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठन करावे, तालुकास्तरावर पत्रकार भवन व्हावे, जिल्हास्तरीय दैनिके व साप्ताहिकांच्या जाहिरात दरात 100 टक्के वाढ व्हावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी भगवान र्शीमंदिलकर, नंदकुमार सातपुते, सचिन अग्रवाल, शकूर शेख, निशांत दातीर आदी उपस्थित होते.