आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान पीक विमा योजना खरिपासाठी लागू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामापासूनच लागू झाली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी केले. पुनर्रचित हवामानआधारित फळपीक विमा योजनेत संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सहभागी होता येणार अाहे, असे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी १८ हजार ७४१ कर्जदार लाख ६२०० बिगर कर्जदार अशा एकूण लाख २५ हजार ३१ शेतकऱ्यांचा बँकेमार्फत पीकविमा उतरवण्यात आला होता. त्यापैकी ९३ हजार १८९ शेतकऱ्यांना ७५ कोटी ४५ लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली.

कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची असून बिगर कर्जदारांसाठी ऐच्छिक आहे. संत्रा, मोसंबी, चिकू पेरू उत्पादकांसाठी १२ जुलै डाळिंब उत्पादकांसाठी १४ जुलैपर्यंत हप्ता भरण्याची अंतिम मुदत आहे. संत्रा मोसंबीसाठी हेक्टरी ७० हजारांचे विमा संरक्षण असून हप्ता साडेतीन हजार आहे. पेरू चिकूसाठी हेक्टरी ५० हजार विमा संरक्षण असून हप्ता अडीच हजार आहे. डाळिंबासाठी हेक्टरी एक लाख दहा हजारांचे संरक्षण असून हप्ता ५५०० रूपये आहे. खरीप पिकांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे.
बातम्या आणखी आहेत...