आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श हिवरेबाजार-केडगाव रस्त्याचा इमलशन कोट कुठे गेला?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाच्या निधीतून हिवरे बाजारला जाण्यासाठी देशातील सर्वात आदर्श असा रस्ता तयार करण्याची घोषणा झाली होती. इमलशन कोट असलेला हा रस्ता दीर्घकाळ टिकेल, असे सांगण्यात आले होते. तथापि, सध्या सुरू असलेले काम अपेक्षाभंग करणारे आहे. केडगाव- पिंपळगाव वाघा-हिवरे बाजार-दैठणे गुंजाळ या रस्त्याच्या कामाची निर्धारित मुदत संपून चार महिने झाले, तरी काम अजून पूर्ण झालेले नाही. केडगाव येथील रस्ता खोदून त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल झाला आहे. त्यामुळे वाहन चालवणेच काय, पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. छाया : कल्पक हतवळणे
पुढील सइडवर पाहा, छायाचित्रे