आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Jandhan Scime Four Half Lakh Accounts

पंतप्रधान जनधन योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत लाख ५३ हजार ८९१ खाती उघडण्यात आली आहेत.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंतप्रधान जनधन योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत लाख ५३ हजार ८९१ खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये १२ कोटी ६९ लाख रुपये जमा झाले असून केंद्र सरकारच्या विविध योजनांना जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व्ही. टी. हुडे यांनी दिली.
जनधन योजनेबाबत जिल्ह्यातील बँकांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. साडेचार लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली असून साडेबारा लाखांपेक्षा अधिक रक्कम या खात्यांवर जमा झाली आहे. पंतप्रधान सुरक्षा योजनेत जिल्ह्यातील लाख हजार ३१४ जणांनी सहभाग घेतला आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत लाख हजार २२५ जण सहभागी झाले आहेत. अटल पेन्शन योजनेत आतापर्यंत हजार १५३ जणांनी सहभाग नोंदवला. सुरक्षा जीवन ज्याेती योजनेत ३१ ऑगस्टपर्यंत पेन्शन योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत सहभाग घेता येणार असल्याची माहिती हुडे यांनी शुक्रवारी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेला प्रारंभ केला. या योजनेत सर्व बँकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेतून १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज लाभार्थ्यांना देण्यात येईल. छोटे उत्पादक, दुकानदार, किरकोळ विक्रेते, भाजीपाला फळे विक्री, सलून ब्युटी पार्लर, यंत्रचालक, कारागीर, बचतगट, व्यावसायिक, स्वयंरोजगार, अन्न प्रक्रिया सेवा पुरवठादारांना हे कर्ज देण्यात येणार आहे. शिशू मुद्रा योजनेतून ५० हजारांपर्यंत, किशोर मुद्रा योजनेतून लाखांपर्यंत, तर तरुण मुद्रा योजनेतून १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण उद्दिष्ट्यांपैकी ६० टक्के कर्ज शिशू मुद्रा योजनेसाठी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन हुडे यांनी केले आहे.

खरिपासाठी १५०९ कोटी पीककर्जाचे वाटप
जिल्ह्यातसमाधानकारक पाऊस झालेला नसतानाही खरीप पिकांसाठी आतापर्यंत १५०९ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी २१४७ कोटींच्या पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ७० टक्के कर्जाचे वाटप आतापर्यंत झाले. खरीप हंगामाच्या पेरण्या ६० टक्क्यांच्या पुढे सरकल्या नसल्या, तरी पीककर्जाच्या उद्दिष्टाने ७० टक्क्यांची आकडेवारी गाठली अाहे.