आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीच्या विमानतळाचे उदघाटन मोदींच्या हस्ते, आॅक्टोबर महिन्यात सुरू हाेणार विमान वाहतूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - बहुचर्चित आणि गेल्या अनेक वर्षापासून बहुप्रतिक्षेत असलेले शिर्डी येथील साईबाबा विमानतळाचे काम पूर्ण होत आले असून येत्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे अधिकृत उद््घाटन करण्यात येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र विमानतळ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना दिली.

पाटील यांनी बुधवारी शिर्डी विमानतळाच्या कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या विमानतळासाठी पंधराशे एकर जमीन संपादित केली अडीच किलोमीटर लांबीची धावपट्टी तयार आहे. विमानतळाची संरक्षक भिंत बांधून झाली आहे. एक हजार चौरस मीटरच्या टर्मिनल इमारतीचे काम सध्या वेगात सुरू आहे. विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे. एटीएस टाँवरसाठी पाच कोटी रुपये खर्च करून यंत्रणा उभारली आहे. सध्या एकाच वेळी चार विमाने उभी राहू शकतील अशी विमान पार्किंग तयार करण्यात आली आहे. तीन टँक्सी वे तयार आहेत. टर्मिनल इमारतीत आयसोलेशच्या कामाची आर्डर देण्यात आली आहे.धावपट्टी अंतराष्ट्रीय विमाने उतरू शकतील अशीच बनवली आहे. सिंगापूर, दुबई, लंडन येथून विमानसेवा सुरू करण्याबाबत विमान कंपन्या इच्छुक आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात देशाअंतर्गत विमानसेवा सुरू केली जाणार असून मुंबई, हैद्राबाद, दिल्ली, बंगळूर इतयादी ठिकाणांहून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांनी एकत्रितपणे या विमानतळाच्या प्रश्नावर भारत सरकारचे हवाई वाहतूक सचिवांशी चर्चा केली होती. त्यानुसार केंद्राची पथके शिर्डीला येऊन गेली आहेत.
बातम्या आणखी आहेत...