आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रधानमंत्री साहाय्यता फंडासाठी शिल्पकार कांबळे जमवणार निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दानशूर व्यक्तींची रेखाचित्रे काढून प्रधानमंत्री साहाय्यता निधीत दोन लाख रुपये जमा करण्याचा संकल्प शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केला आहे. बुधवारी (१७ सप्टेंबर) ते हा उपक्रम राबवणार आहेत.

वाढदिवस साजरा न करता प्रधानमंत्री फंडासाठी मदत करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. त्याला प्रतिसाद देत कांबळे यांनी दानशूर व्यक्तींची रेखाचित्रे काढून निधी जमवण्याचे ठरवले आहे. एका रेखाचित्रासाठी ते पाच हजार रुपये आकारणार आहेत. सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत प्रेमदान चौकातील स्वीट होम हॉटेलमध्ये हा उपक्रम ते राबवणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून ९८२२०६९०५६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची नावे पंतप्रधान कार्यालयाला कळवण्यात येणार आहेत. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कलाजगत अॅकॅडमी ऑफ फाईन आर्टसच्या वतीने करण्यात आले आहे. कांबळे यांनी यापूर्वी किल्लारीतील भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, तसेच कारगिल युद्धातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अशा प्रकारे उपक्रम राबवून मदतनिधी जमवला होता.