आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमर्यादा वाढीसाठी बांगड्यांचा आहेर, गुरुकुल मंडळाच्या उच्चधिकार समितीचे आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधारी सदिच्छा मंडळाच्या संचालकांनी कर्जर्मयादा कमी केल्याने सभासदांना कर्जासाठी इतर संस्थांपुढे हात पसरावे लागत आहेत. कर्जर्मयादेत तातडीने वाढ करावी, या मागणीसाठी विरोधी गुरुकुल मंडळाच्या उच्चाधिकार समितीच्या वतीने लालटाकी येथील बँकेच्या कार्यालयातील संचालकांच्या खुच्र्यांना बांगड्यांचा आहेर घालून रविवारी निषेध नोंदवण्यात आला.

निवडणूक असो की वार्षिक सभा, शिक्षक बँक नेहमीच चर्चेत असते. बँकेचे पदाधिकारी, संचालक, तसेच विरोधी मंडळाचे सदस्य यांच्यातील वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. बँकेच्या काही सभांमध्ये तर हाणामारीचे प्रकार घडले आहेत. सत्ताधारी सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. सत्ताधारी सदिच्छा मंडळाच्या संचालकांनी निवडून आल्यानंतर कर्जर्मयादा 11 लाखांवरून थेट सव्वातीन लाखांपर्यंत कमी केली. त्यामुळे हजारो सभासदांची आर्थिक कुचंबना होत असून कर्जासाठी त्यांना इतर संस्थांपुढे हात पसरावे लागत आहेत. सत्ताधार्‍यांनी कर्जर्मयादेत वाढ करण्याऐवजी कर्जदरात वाढ केली आहे. सभासदांना पूर्वी 9 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होत होते. मात्र, आता त्यांना साडेबारा टक्क्यांनी कर्ज घ्यावे लागत आहे. सभासदहिताचा विषय पुढे आला की, संचालक सीडीरेशोचा विषय पुढे करतात. बोनस, मेहनताना, तसेच फर्निचर खरेदी करताना त्यांना सीडीरेशो आठवत नाही का, असा प्रश्न गुरुकुलच्या सदस्यांनी उपस्थित करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

सभासदांच्या हितासाठी कर्जर्मयादेत तातडीने वाढ करून व्याजदर कमी करावा, जेणेकरून सभासदांना कर्जासाठी इतर संस्थांकडे जावे लागणार नाही. या पार्श्वभूमीवर गुरुकुल उच्चाधिकार समितीच्या वतीने रविवारी लालटाकी परिसरातील बँकेच्या कार्यालयात गांधीगिरी करण्यात आली. जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांमध्ये असे आंदोलन करण्यात आले.

या वेळी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष अनिल आंधळे, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, संजय गारूडकर, जालिंदर खाकाळ, माणिक जगताप, अंबादास गारूडकर, संजय काळे, शरद धलपे, संदीप आंधळे, दस्तगीर शेख, बाळासाहेब गारकुंड आदी उपस्थित होते.

कारभार असमाधानकारक
सत्ताधारी संचालकांचा कारभार असमाधानकारक आहे. त्यामुळे सत्ताधारी सदिच्छा मंडळाच्या अध्यक्षांनी संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. कमी केलेली कर्जर्मयादा वाढावी, अशी सभासदांची रास्त मागणी आहे. त्यासाठी विरोधकांची आंदोलनाची भूमिका योग्यच आहे.’’ आबासाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक संघ

..अन्यथा तीव्र आंदोलन
सत्ताधारी सदिच्छा मंडळाच्या संचालकांकडून सभासदांना वेठीस धरण्यात येत आहे. निवडून येताच त्यांनी कर्जर्मयादा कमी करून सभासदांची आर्थिक कुचंबणा केली आहे. त्यामुळे गुरुकुलच्या उच्चाधिकार समितीच्या वतीने गांधीगिरी करण्यात आली. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’ अनिल आंधळे, अध्यक्ष, उच्चधिकार समिती, गुरुकुल मंडळ