आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priority To The Deprived Class : Revenue Minister Balasaheb Thorat

उपेक्षितांच्या विकासाला प्राधान्य : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - त्यागाची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाने सामान्यांच्या विकासासाठी काम करताना समाजातील उपेक्षित घटकांच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यांच्यासाठी अनेक योजना शासनाने सुरू केल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेरमध्ये आयोजित दुर्बल घटकांच्या मेळाव्यात ते शनिवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य समन्वयक विलास रुपवते होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, सुरेश थोरात या वेळी उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, दलित, निराधार, निरार्शित व गोरगरिबांच्या विकासासाठी पक्षाने विकासाची धोरणे आखली आहेत. उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्याच्या मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. समाजातील या घटकांची मोठी ताकद कायम पक्षाच्या मागे उभी राहिली. वैयक्तिक लाभाच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यापुढेही उपेक्षितांच्या उन्नतीसाठी सवरेतोपरी मदत करण्याची आपली भूमिका असून शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, गरिबांसाठी इंदिरा गांधी यांनी अनेक योजना राबवल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सोनिया गांधी गरिबांच्या उन्नतीसाठी काम करीत आहेत. देशातील गरीब-श्रीमंतांतील दरी कमी करताना विकासासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले. रुपवते म्हणाले, निराधार, दुर्बल घटकांची मोठी ताकद असून सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. वैयक्तिक विकासापेक्षा समाजहिताला प्राधान्य देऊन विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे मोठे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दुर्गा तांबे, बाबा ओहोळ, बाबा खरात, सुरेश थोरात, विवेक कासार यांचीही भाषणे झाली. मेळाव्यासाठी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.