आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithviraj Chavan Meeting Canceled, Latest News In Divya Marathi

पृथ्वीराज चव्हाण यांची नगरमधील सभा रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरमधील काँग्रेसचे उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियोजित सभा रद्द झाली. रविवारी दुपारी दोन वाजता गांधी मैदानावर ही सभा होणार होती.
मात्र, हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तांबे यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत त्यांचे मामा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या दिग्गज नेत्याची सभा झाली नाही. रविवारची पर्वणी साधून माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले. दुपारी दोन वाजता होणाऱ्या या सभेची कोणतीही तयारी करण्यात आलेली नव्हती. जाहिराती पाहून आलेले काही कार्यकर्ते मोकळे मैदान पाहून परत जात होते. काही कार्यकर्ते तेथे थांबून सभेबाबत विचारणा करत होते. सभा रद्द होण्यामागे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगण्यात आले.