आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुकडी'चे श्रेय कुणीही घ्या, पण पाणी सोडा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात पाऊस नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुकडीतून आवर्तन सोडले नाही, तर चार तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या साडेसहा टीएमसीपैकी तीन टीएमसी पाणी तातडीने सोडावे. आजी माजी आमदार पाण्यासाठी पत्र दिल्याचे सांगतात. या पाण्याचे श्रेय कुणीही घ्या, पण पाणी सोडा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी मंगळवारी केली.
शेलार म्हणाले, जुलै संपला, तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी जुलैअखेर सर्व धरणांमध्ये साडेसहा टीएमसी म्हणजे २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. अशा परिस्थितीत अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले. यावर्षी तशीच परिस्थिती आहे. सद्यस्थितही प्रकल्पामध्ये एकूण साडेसहा टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील तीन टीएमसी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे. हे आवर्तन सोडले, तर चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल, तसेच टँकरसाठी उद्भव उपलब्ध होईल. पण पाणी सोडलेच नाही, तर दहा दिवसांनी कुकडीखाली येणाऱ्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होईल. आमदार नामदारांनी आम्ही पाणीप्रश्न सोडवतो, असे म्हणण्यापेक्षाही आपण काय करतो याला महत्त्व आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना राजकारण सुरू आहे. कुकडीला आवर्तन सोडण्याचे श्रेय कुणीही घ्या, पण पशुधन वाचवण्यासाठ पाणी सोडा. आजीव माजी आमदार म्हणतात आम्ही पाणी सोडण्यासाठी पत्रव्यवहार केला, पण आता सर्वपक्षीय लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे, असे शेलार यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्यासाठी श्रीगोंदेकरांकडून आंदोलनाचे हत्यार उपसले जात आहे. पावसाने दडी मारल्याने संपूर्ण जिल्हाभरातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या येडगाव, माणिक डोह, वडस, डिंभे या धरणांमध्ये साडेसहा टीएमसी पाणी शिल्लक आहे. कुकडीवर श्रीगोंदे, पारनेर, जामखेड, कर्जत हे तालुके अवलंबून आहेत. यापार्श्वभूमीवर कुकडीचे पाणी सोडण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. पाण्याचे आवर्तन सोडण्याचा तिढा अजूनही संपलेला नाही. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पाणी सुटण्याची शक्यता आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा, धरण साठा व इतर माहिती..