आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात या वर्षी धान्याचे उत्पादन 70 टक्के घटणार, दरही कडाडण्याची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- खरिपाच्या काळात पावसाने दडी मारल्याने यंदा जिल्ह्यातील अन्नधान्याचे उत्पादन ७० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. पावसाअभावी बाजरीसह मूग, उडीद, तूर, सोयाबीन, मका, भुईमूग या पिकांची वाढ खुंटली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. उत्पादन घटणार असल्यामुळे अन्नधान्याच्या किमतीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. यंदा तब्बल लाख ११ हजार ६६५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. तथापि, आता उभी पिके जळू लागल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. 

जिल्ह्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात दमदार पाऊस झाला. जुलै महिना मात्र कोरडा गेला. ऑगस्टचे सतरा दिवस उलटले, तरीदेखील समाधानकारक पाऊस झाल्याने पिके सुकू लागली आहेत. जिल्ह्यात खरिपाचे लाख ७८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे यंदा लाख ७० हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जूनच्या प्रारंभी चांगला पाऊस झाल्याने पेरण्याही चांगल्या झाल्या. ते १८ जूनदरम्यान जिल्ह्यात ३२ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला होता. त्यामुळे दीड लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या. १९ जूनपासून मात्र पावसाने पाठ फिरवली. १९ जून ते १३ जुलैपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाच्या २० टक्के पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. ज्या भागात पेरण्या झाल्या, त्या भागातील पिके पावसाअभावी सुकू लागली. जूनच्या शेवटच्या आठवड्यातील चार दिवस पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या लाख ७५ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यानंतर जुलै महिना संपूर्ण कोरडा गेला. तथापि, जुलैअखेर जिल्ह्यात लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. 

ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात तुरळकच पाऊस झाला, तरी देखील पेरण्यांची टक्केवारी ९८.२१ वर गेली. लाख ११ हजार ६६५ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मात्र, पावसाने आेढ दिल्याने बाजरी, मूग, सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद, भुईमूग यासह चारापिकांची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यात बाजरीची लाख ३० हजार ७९९ हेक्टरवर, तर मक्याची ४७ हजार ४१७ हेक्टरवर लागवड झाली असून, वाढ खुंटल्याने उत्पादनात ७० टक्के घट येण्याची शक्यता आहे. तुरीची २० हजार ४४३ हेक्टरवर, मुगाची ४० हजार २५३ हेक्टरवर, सोयाबीनची ७४ हजार ९४६ हेक्टरवर, तर भुईमुगाची ६० हजार ७३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली अाहे. उडदाची ४५ हजार ८३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसात खंड पडल्याने अनेक भागातील पीक जळू लागले आहे. कापसाच्या उत्पादनातही ७० टक्के घट होण्याची शक्यता आहे. 

अकोले तालुक्यात यंदा दमदार पाऊस झाला. या भागात लाख ४२ हजार हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. भातपिकाची परिस्थिती चांगली आहे. नगर तालुक्यात ४१ टक्के पाऊस झाला आहे. २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या तालुक्यात खरिपाची स्थिती चिंताजनक आहे. पारनेर तालुक्यात ५५ टक्के पाऊस झाला असून, पावसाअभावी वाटाणा, तूर, मूग, सोयाबीन या पिकांची वाढ खुंटली आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वच पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. कर्जत, जामखेड तालुक्यातही पिके सुकू लागली आहेत. श्रीगोंदे तालुक्यात खरिपाच्या पिकांबरोबर फळबागांनाही पाणी नाही. राहुरी, श्रीरामपूर, नेवासे, संगमनेर, कोपरगाव, शेवगाव, राहात्यात पिकांची परिस्थिती बरी आहे. 

ज्वारीचा पेरा हुकला, तर चाराटंचाई अटळ 
जिल्ह्यातदरवर्षी गोकुळाष्टमीला होणाऱ्या पावसानंतर ज्वारीची पेरणी केली जाते. तथापि, यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे गोकुळाष्टमीला पेरणी होऊ शकली नाही. येत्या पाच दिवसांत पाऊस झाल्यास पोळ्याच्या सणापर्यंत पेरणी होऊ शकते, जर यंदा ज्वारीचा पेरा हुकला, तर उन्हाळ्यात तीव्र चाराटंचाई निर्माण होऊन चाऱ्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. 
जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेबरोबरच पावसाचे प्रमाण जमिनीचे प्रकार भिन्न आहेत. जमिनीचा प्रकार, तसेच पाण्याच्या उपलब्धतेवर पिकांचे उत्पादन होते. जिल्ह्यात सुमारे पावणेपाच लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होतात. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात खरिपाची पेरणी होऊन उत्पादनही चांगले झाले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात बाजरी, मूग, उडीद, तसेच कपाशीची पेरणी होते. त्यानंतर ज्वारीउत्पादक शेतकरी गोकुळाष्टमीला पेरणी करतात. जिरायत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली जाते. परंतु यंदा पाऊस झाल्याने ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्वारीची पेरणी झाली नाही, तर उन्हाळ्यात जनावरांसाठी आवश्यक असलेली वैरण उपलब्ध होणार नाही. 

मुळा धरणातील साठा घटला 
पावसानेआेढ दिल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. नगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात सध्या ७०.८० टक्के पाणीसाठा अाहे. गेल्या वर्षी या धरणात ९६.३२ टक्के साठा होता. भंडारदरा धरणात सध्या ९६.१४ टक्के साठा आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा 
जिल्हाधिकारीअभय महाजन यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील खरिपाच्या स्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागासह अन्य यंत्रणांना दिल्या. जिल्हा कृषी अधिक्षक पंडित लोणारी, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यावेळी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...