आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारक यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ माजी सैनिक आक्रमक, मोर्चा काढून नोंदवला निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक माजी सैनिकांच्या कुटुंबीयाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ माजी सैनिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला. यावेळी परिचारक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष संजय वाघ, उपाध्यक्ष अंबिका निर्मल सचिव बी. के. डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली माळीवाडा येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. चांदणी चौकामार्ग हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. मोर्चात संस्थेच्या कोषागार रुबेन कमलोरी, एकनाथ कुलकर्णी, ईश्वर गपाट, निर्मल काळदाते, शांतीलाल होन, श्रीनिवास वाडेकर, अशोक राजळे, सहदेव घनवट, भानुदास सपाटे, संपतराव खलाते, प्रभाकर जगताप, हारुण शेख, जालिंदर मगर, के. पी. खोमणे, अंबादास पालवे, डी. बी. निकम, आर. एस. साळवे, संजय ढाकणे, अनिल दरेकर, बाळासाहेब उंडे, कृष्णा सरदार, अरुण फाटके, विठ्ठल कांडेकर, सुनीता हिरडे, मंगल लोंढे, बाळासाहेब शेळके, सूर्यभान गुंड यांच्यासह माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर तेथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी झालेल्या भाषणात माजी सैनिकांबद्दल केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. परिचारक यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक सैनिकांच्या पत्नीबाबत केलेले वक्तव्य हे अशोभनीय आहे. आपले भारतीय सैनिक अहोरात्र देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देश सेवा करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून हजारो मैल दूर अंतरावर राहून पहारा देत आहेत. सैनिकांच्या कुटुंबीयांविषयी वक्तव्य केलेल्या विचारांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी केलेले वक्तव्य हे संपूर्ण देशातील सैनिक त्यांच्या पत्नी, वीरपत्नी, वीरमाता यांचा अपमान करणारे आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या परिचारक यांनी तातडीने आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्याचबरोबर त्यांना पुढील पंधरा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी. अशा प्रकारचे संस्कार विचारधारा असणाऱ्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत जाण्याचा अधिकार नाही. तो त्या सभागृहाचा अपमान होईल. सैनिक सैनिकांच्या कुटुंबीयांची जाहीर बदनामी करणाऱ्या परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

राजीनामा दिल्यास आंदोलन तीव्र करणार 
आमदारप्रशांत परिचारक यांनी सैनिक त्यांच्या कुटुंबीयाबद्दल केलेले वक्तव्य हे अतिशय निषेधार्थ आहे. परिचारक यांनी तातडीने आमदारकीचा राजीनामा द्यावा; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
- संजयवाघ, अध्यक्ष, माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था. 
बातम्या आणखी आहेत...